पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार कलंकित उमेदवाराचा प्रचार

पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार कलंकित उमेदवाराचा प्रचार

  • Share this:

unnamed09  ऑक्टोबर : भ्रष्ट्राचाराचे आरोप झालेल्याना भाजपात प्रवेश दिल्यान भाजपवर टीका होत आहे. त्यातच आता अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथे आज भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेणार आहे. पण गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी खुद्द पंतप्रधान येत असल्याने भाजपा पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता आहे.

भाजपनं राहुरीमध्ये उमेदवारी दिलेले शिवाजी कर्डिले या वादग्रस्त उमेदवारासह, जिल्ह्यातील 12 उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदी आज (गुरूवारी) सकाळी 11 वाजता सभा घेणार आहेत.

शिवाजी कर्डिले यांच्यावर विरोधात 12 खटले सुरू असून बँक प्रकरणात 1 वर्ष सक्तमजुरी आणि 3 महिन्याचा तुरुंगवासाची शिक्षाही झाली आहे. त्यामुळे या प्रकरणातील फिर्यादी शंकर राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर लॉटरी विक्रेते अशोक लांडे खून प्रकरणी पुरावे नष्ट केल्याचे आरोप त्यांच्यावर असून त्याची नियमित सुनावणी सुरू आहे.

भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीविरोधात बोलणारे पंतप्रधान अशा गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तीच्या प्रचारासाठी येत असल्यानं अहमदनगरमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

दरम्यान, या प्रकरणी शिवसेनेनं पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवाराच्या प्रचारावर शिवसेनेन आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.

शिवाजी कर्डिले, भाजप उमेदवार : गुन्हेगारी पार्श्वभूमी

  • 2002 : अहमदनगर जिल्हा बँक निवडणूक बोगस मतदान प्रकरण

                       : एक वर्षाची शिक्षा, जामिनावर सुटका

  • 2011 : खंडणी आणि बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी

                      : खटला अहमदनगर कोर्टात सुरू

  • 2012 : अशोक लांडे खून प्रकरण

                      : फिर्यादींवर दबाव आणणे, पुरावे नष्ट करणे याप्रकरणी गुन्हे दाखल

                      : खटला नाशिक कोर्टात सुरू

Follow @ibnlokmattv

First published: October 9, 2014, 10:07 AM IST

ताज्या बातम्या