पंढरपुरात तब्बल 1 कोटींची रोकड जप्त

पंढरपुरात तब्बल 1 कोटींची रोकड जप्त

  • Share this:

pandharpur car08 ऑक्टोबर :निवडणुकीच्या रणधुमाळीत एकीकडे प्रचाराचा धुरळा उडत आहे. तर दुसरीकडे पैसे सापडण्याचे प्रकार वारंवार घडत आहे. पंढरपूरमध्ये एका कारमध्ये तब्बल 1 कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने कारवाई करत ही रक्कम जप्त केली असून तीन जण ताब्यात घेतलं आहे. पंढरपुरातील तीन रस्ता चौकात एका इंडिका कारमध्ये ही रक्कम सापडली. दोन पोते आणि एका सुटेकसमध्ये ही रक्कम नेण्यात येत होती. ही रक्कम कुणाची आहे याचा तपास केला जात आहे.

विशेष म्हणजे मागील आठवड्यात बुधवारी पंढपूरमध्ये गोपाळपूर इथं एका मारूती व्हॅनमधून भरारी पथकाने 40 लाखांची रक्कम जप्त केली होती. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आणि मारूती व्हॅनही जप्त केली.

बुलडाणा जिल्ह्यात भोकरवाडीजवळ 80 लाखांची रोकड सापडली आहे. एका कारमध्ये पोत्यांमध्ये ही रक्कम आढळली. या प्रकरणी 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय. निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ही कारवाई केलीये.

इतका पैसा आला कुठून?

धुळे : 36 लाख 50 हजारांची रोकड जप्त

साक्री-नंदुरबार मार्गावर रोकड जप्त

एक आरोपी ताब्यात

-भांडुप : 25 लाखांची रोकड जप्त

भांडुपच्या एलबीसी रोडवर रोकड जप्त

तिघेजण पोलिसांच्या ताब्यात

पंढरपूर- 40 लाख

धुळे - 11 लाख जप्त

पंढरपूर : 1 कोटी रुपयांची रोकड जप्त

तीन रस्ता चौकात मारुती कारमध्ये सापडली रक्कम

3 जण ताब्यात, गाडी जप्त

- विरारमध्ये 3 लाख 20 हजारांची रोकड पकडली.

कन्हेर फाट्याजवळ निवडणूक भरारी पथकाची कारवाई

- बुलडाणा

 80 लाखांची रोकड

2 जणांवर कारवाई

 

आयबीएन लोकमतचे सवाल

हा पैसा येतो कुठून ?

निवडणुकीच्या काळातच पैशाचा महापूर येतो का?

कोट्यवधींचा काळा पैसा बाहेर येतो का?

पैशाच्या बळावर मतांची खरेदी ?

पैशासाठी निवडणुका की निवडणुकीसाठी पैसा ?

पैशाच्या मालकांचा छडा लागेल का ?

पोलीस मुळापर्यंत पोहोचतील का ?

Follow @ibnlokmattv

First published: October 8, 2014, 4:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading