मध्य रेल्वेचंही वेळापत्रक कोलमडलं

मध्य रेल्वेचंही वेळापत्रक कोलमडलं

  • Share this:

mumbai-locals

08 ऑक्टोबर : कोकण रेल्वेपाठोपाठ मध्य रेल्वेचंही वेळापत्रक आज (बुधवारी) सकाळी सिग्नलमधल्या तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा एकदा कोलमडलं आहे. कल्याण स्टेशनजवळ सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या ट्रेन्स सुमारे 10-15 मिनिटं उशिराने धावत आहेत. सिग्नल दुरुस्तीचं काम सुरू असून, काही वेळातच रेल्वे वाहतूक पूर्ववत करण्यात येईल, असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र, यामुळे ऑफिसला जाणार्‍या मुंबईकरांना चांगलेच हाल सोसावे लागत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे रुळांवरून घसरणे, ओव्हरहेड वायर तुटणे किंवा त्यात बिघाड होण्याचे प्रकार वारंवार होत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2014 10:35 AM IST

ताज्या बातम्या