फ्लिपकार्टने मागितली ग्राहकांची जाहीर माफी

फ्लिपकार्टने मागितली ग्राहकांची जाहीर माफी

  • Share this:

flipkart_flop copy08 ऑक्टोबर :  'बिग बिलियन डे'च्या दिवशी उडालेल्या गोंधळाबद्दल फ्लिपकार्टने काल (मंगळवारी) आपल्या ग्राहकांची जाहीर माफी मागितली आहे.

फ्लिपकार्टने सोमवारी ऑलाईन मेगा सेल ठेवला होता. सकाळी आठ वाजता सुरू होणारा हा सेल कॅश करण्यासाठी सकाळी सात-साडे सातपासूनच कम्प्युटरसमोर बसलेले ग्राहक असं चित्र सोमवारी देशभरात होते. घड्याळात आठचा ठोका पडला आणि खरेदीला जोरदार सुरुवात झाली. पण ग्राहकांच्या मोठ्या संख्येमुळे वेबसाइट काही वेळातच 'क्रॅश' झाली.

ग्राहकांना सहन करायला लागलेल्या मनस्तापाबद्दल फ्लिपकार्टने दिलगिरी व्यक्त करणारा ई-मेल ग्राहकांना पाठवला आहे. 'बिग बिलियन डे' या दिवशी ग्राहकांना खरेदीचा चांगला अनुभव यावा अशी आमची अपेक्षा होती, मात्र दिवसअखेर आम्हाला उलट प्रतिक्रिया मिळाल्या. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल माफी मागतो' असं या ई-मेलमध्ये म्हटलं आहे.

ग्राहकांना या दिवशी जास्तीत जास्त खरेदी करता यावी यासाठी फ्लिपकार्टची पूर्ण टीम गेला एक महिना मेहनत घेत होती, असा दावा फ्लिपकार्टनं केला आहे. पण ही तयारी पूर्ण नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. ग्राहकांनी मागणी केलेल्या बर्‍याचशा वस्तू आमच्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हत्या. यामुळे काही मिनिटांच्या आतच वर्‍याच वस्तू 'आऊट ऑफ स्टॉक' गेल्या. तसंच आमच्या सर्व्हरवरही ताण आला, अशीकबुलीही संस्थापकांनी दिली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: October 8, 2014, 10:31 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading