कोकण रेल्वेची वाहतूक अजूनही विस्कळीत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2014 10:16 AM IST

Chiplun railway accident2

08 ऑक्टोबर :  कोकण रेल्वेची वाहतूक अजूनही ठप्पच आहे. ट्रॅक दुरुस्तीचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. ट्रॅकवरील मालगाडीचे सर्व डबे हटवण्याचंही काम सुरू आहे पण अजूनही दोन वॅगन रेल्वे ट्रॅकवर आहेत. कोकण रेल्वेची वाहतूक संध्याकाळपर्यंत रुळावर येण्याची शक्यता आहे.

चिपळूणच्या खेर्डी पुलाजवळ काल (मंगळवारी) मालगाडीचे 10 डबे घसरल्याने हा अपघात झालामुळे कोकण रेल्वे पूर्णपणे ठप्प आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रेल्वे ट्रॅकचं मोठं नुकसान झाल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, कोकणातून मुंबईत जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस विलवडे इथे तर राज्यराणी एक्स्प्रेस रत्नागिरी इथे थांबवण्यात आल्या आहेत. मुंबईवरून कोकणात येणारी राज्यराणी एक्सप्रेस माणगांव मध्ये तसेच कोकणकन्या एक्सप्रेस दिवाणखवटी इथे थांबवली आहे. रत्नागिरी-दादर पॅसेंजर गाडी रद्द करण्यात आली आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 8, 2014 09:08 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...