वेगळ्या विदर्भाची भूमिका कालही आणि आजही -जावडेकर

वेगळ्या विदर्भाची भूमिका कालही आणि आजही -जावडेकर

  • Share this:

prakash javadekar07 ऑक्टोबर : वेगळा विदर्भ ही आमची भूमिका कालही होती आणि आजही आहे. शिवसेनेचा काय मुद्दा आहे हा त्यांचा विषय आहे असं स्पष्ट मत केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर व्यक्त केलं. आम्हीची प्रतिबंधता जनतेशी असून महाराष्ट्र राज्य काँग्रेस -राष्ट्रवादी मुक्त करायचंय हे आमचं लक्ष्य आहे असंही जावडेकर म्हणाले. ते पालघरमध्ये बोलत होते.

विधानसभा निवडणुकीत वेगळ्या विदर्भाचा मुद्दा तापतोय. विदर्भ वेगळा करण्याचा भाजपचा डाव आहे, असा पुनरुच्चार आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केला. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे तुकडे करणार नाही अशी ग्वाही देत आहे तर दुसरीकडे भाजपचे नेते विदर्भ वेगळा करण्याची आश्वासन देतं आहे. यासाठी तुम्हाला छत्रपती शिवरायांचा आशीर्वाद हवाय का ? असा संतप्त सवालही उद्धव यांनी केला.

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आज पालघरमध्ये प्रचार सभेसाठी आले होते. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत जावडेकरांनी वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलं. वेगळा विदर्भ ही आमची भूमिका कालही होती आणि आजही आहे. .आमची विदर्भाविषयीची भूमिका पहिली जी होती ती आताही कायम आहे. शिवसेनेचा काय मुद्दा आहे हा त्यांचा विषय आहे. जेव्हा आम्ही युतीत होतो तेव्हा त्यांची भूमिका वेगळी होती तरीही आमचा संसार सुखाचा झाला असंही स्पष्टीकरण जावडेकरांनी दिलं. तसंच आमची प्रतिबंधता ही महाराष्ट्राशी आहे. आताच मुद्दा जनतेशी प्रतिबंधतेचा आहे. जनतेला चांगलं राज्य देणं या जुलमी राज्यातून त्यांची मुक्तता करणे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र करणे आणि आमचं सध्याचं राज्य कालबद्धीतने ते अंमलात आणणे हे आमचं उद्दिष्ट आहे असं जावडेकरांनी सांगितलं.

Follow @ibnlokmattv

First published: October 7, 2014, 11:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading