शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही - मोदी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 7, 2014 05:57 PM IST

modi 5 sep speech

07 ऑक्टोबर :   जोपर्यंत मी दिल्लीत सत्तेवर आहे तोपर्यंत शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, अशी ग्वाही देत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव असल्याचा विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं आहे. मुंबईशिवाय महाराष्ट्र अपूर्ण असून देशाला पुढे नेण्याची ताकद फक्त महाराष्ट्रात असल्याचंही मोदी म्हटले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज धुळ्यातल्या दोंडाईचा इथे आज (मंगळवारी) झालेल्या सभेत ते बोलत होते.

मोदींनी आजच्या भाषणाची सुरुवात अहिराणी भाषेतून केली. भाजपची सत्ता आल्यास राज्याचे तुकडे पडतील अशी भीती जवळपास सर्व पक्षांना वाटू लागल्याचं सांगत, त्यांना उत्तर देताना मोदी म्हणाले, निवडणुकीचा जोर चढू लागताच काही मंडळी वाटेल ते बोलू लागलेत. दिल्लीत सत्तेवर असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही. मुंबई ही महाराष्ट्राचा अविभाज्य घटक असल्याचे मोदींनी स्पष्ट केले आहे. पण यावेळी स्वतंत्र विदर्भाविषयी भूमिका जाहीर करणं त्यांनी टाळले आहे.

मोदींनी केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध योजनांची माहिती देत काँग्रेसवरही जोरदार हल्ला चढवला आहे. 15 वर्षांत महाराष्ट्रात 2 पिढ्या बरबाद केल्या, घोटाळे केले, असा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला आहे. तसचं मी गरिबीत वाढलो आहे त्यामुळे गरिबांचं दु:ख मी जाणतो, त्यासाठी झोपडीत जाऊन फोटो काढण्याची मला गरज नाही, असा टोला मोदींनी नाव न घेता राहुल गांधींना लगावला आहे. मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग याच एका विषयावर काँग्रेसने गेल्या अनेक निवडणुका लढवल्या. पंचायतीपासून संसदेपर्यंत सगळीकडे त्यांचेच राज्य होते. पण तरीही एका इंचाचीही प्रगती झाली नाही, अशी घणाघाती टीकाही त्यांनी काँग्रेसवर केली आहे. कापूस व कांदा उत्पादक शेतकर्‍यांवर अन्याय होऊ देणार नाही. शेतकर्‍यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार असलेल्यांन विरोधात 15 ऑक्टोबररोजी मतदान करून 15 ऑक्टोबरला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा उत्सव साजरा करा असं आवाहन मोदींनी मतदारांना केलं आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 7, 2014 01:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...