पालघरमध्ये 150 गावांनी उपसले बहिष्कारास्त्र

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2014 06:49 PM IST

पालघरमध्ये 150 गावांनी उपसले बहिष्कारास्त्र

palghar_news06 ऑक्टोबर : पालघर जिल्ह्यातील जवळपास 100 ते 150 बिगर आदिवासी गावांनी येत्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. पेसा कायद्यानुसार आदिवासींना नोकरीत 100 टक्के आरक्षण मिळणार आहे मात्र निर्णयाच्या विरोध आदिवासींनी बहिष्काराचे शस्त्र उपसले आहे.

नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्यात पेसा कायद्यानुसार आदिवासींना शासकीय नोकर्‍यांमध्ये 100 टक्के आरक्षण मिळणार

असल्याचा अध्यादेश राज्यपालांनी काही महिन्यापूर्वीच काढला आहे. त्यामुळे आदिवासी अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी समाजाला शासकीय नोक-यामध्ये क आणि ड क्षेणीत 100 टक्के आरक्षण मिळणार आहे. या जिल्ह्यात आदिवासी पेक्षा बिगर आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात असल्याने या अध्यादेशाचा मोठा फटका त्यांना बसणार आहे. त्यामुळे या अध्यादेशाविरोधात मोठा रोष बिगर आदिवासी संघटनामध्ये पाहायला मिळत आहे. राज्यपालांचा हा अध्यादेश बिगर आदिवासीसाठी अन्याय कारक असून आपल्यावर झालेल्या अन्यायासाठी बिगर आदिवासी संघटनेने या आधी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. शिवाय मोठया प्रमाणावर रास्ता रोको, जेलभरो आदोलन केले होते. मात्र शासन दरबारी काही दखल घेतली जात नसल्याने आता बिगर आदिवासी संघटनेने आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2014 06:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...