भाजपचं आया'राम', 55 उमेदवारांवर भिस्त !

भाजपचं आया'राम', 55 उमेदवारांवर भिस्त !

  • Share this:

bjp other cadinet06 ऑक्टोबर : प्रत्येक निवडणुकीत आयाराम-गयाराम सुरूच असतं पण यंदाच्या निवडणुकीत या आयाराम-गयारामांच्या भरवश्यावर अनेक पक्षांची मदार आहे. स्वबळावर लढणारा भाजपची भिस्तही अशाच आयारामांवर आहे. भाजपने स्वबळाचा नारा जरी दिला असला तरी इम्पोर्टेड उमेदवारांचा पक्ष ठरला आहे. भाजपच्या 253 उमेदवारांपैकी तब्बल 55 उमेदवार इतर पक्षातून आलेले आहे. 20 टक्के उमेदवार ही वेगवेगळ्या पक्षांतून भाजपमध्ये जमा झाले आहे.

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी वैद्यकीय मंत्री विजयकुमार गावीत नंदुरबारमधून भाजपच्या तिकीटावर रिंगणात उतरले आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीतून बबनराव पाचपुते,मंदा म्हात्रे,संजय सावकारे, किसनराव कथोरे भाजपच्या तिकीटांवर लढत आहे.

तर काँग्रेसमधून भाऊसाहेब वाकचौरे, संजय पाटील दुधगावकर, प्रशांत ठाकूर भाजपकडून लढत आहे. एवढंच नाहीतर गेल्या 25 वर्षांपासून संसार थाटलेल्या शिवसेनेतूनही आयाराम दाखल झाले आहेत.औरंगाबाद मध्यमधून किशनचंद तनवाणी, इगतपुरीतून चंद्रकांत खाडे, बाबासाहेब तांबे,शरद ढमाले, नेताजी डोके, जयसिंग एरंडे आणि भगवान बोरस्ते ही शिवसैनिकही भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

विशेष म्हणजे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी झालेल्या सभेत भाजपवर टीका केली होती. स्वबळाची भाषा बोलणार्‍या भाजपने 52 उमेदवार आयात केले. हे कसलं स्वबळ आहे. जे आयात केले तेच आमच्या विरोधात उभे केले. स्वतःच्या बळावर उमेदवार निवडून आणता येत नाही का ? असा टोला लगावला होता.

भाजपची आयात उमेदवारांवर भिस्त

नंदुरबार - विजयकुमार गावीत - राष्ट्रवादी

धुळे - अनिल गोटे - लोकसंग्राम पक्ष

धुळे ग्रामीण - मनोहर बदाने - काँग्रेस

भुसावळ - संजय सावकारे - राष्ट्रवादी

चोपडा - जगदीश वळवी - राष्ट्रवादी

अंमळनेर - बी.एस पाटील - राष्ट्रवादी

इगतपुरी - चंद्रकांत खाडे - शिवसेना

देवळाली - रामदास सदाफुले - राष्ट्रवादी

सिन्नर - माणिकराव कोकाटे - काँग्रेस

श्रीगोंदा - बबनराव पाचपुते - राष्ट्रवादी

कोपरगाव - स्नेहलता कोल्हे - राष्ट्रवादी

पारनेर - बाबासाहेब तांबे - शिवसेना

राहुरी - शिवाजी कर्डिले - राष्ट्रवादी

राहाता - राजेंद्र पिपाडा - राष्ट्रवादी

नेवासा - बाळासाहेब मुरकुटे - काँग्रेस

आष्टी - भीमराव धोंडे - राष्ट्रवादी

अहमदनगर - अभय आगरकर - राष्ट्रवादी

श्र्रीरामपूर - भाऊसाहेब वाकचौरे - काँग्रेस

पाथर्डी - मोनिका राजळे - राष्ट्रवादी

अमरावती - सुनील देशमुख - काँग्रेस

हिंगणा - समीर मेघे - काँग्रेस

बुलडाणा - योगेंद्र गोडे - काँग्रेस

वरोरा - संजय देवतळे - काँग्रेस

मोर्शी - अनिल बोंडे - अपक्ष

चिंचवड - लक्ष्मण जगताप - राष्ट्रवादी

दौंड - राहुल कुल - राष्ट्रवादी

भोर - शरद ढमाले - शिवसेना

जुन्नर - नेताजी डोके - शिवसेना

खेड - शरद बुट्टे पाटील - राष्ट्रवादी

आंबेगाव - जयसिंग एरंडे - शिवसेना

निफाड - भगवान बोरस्ते - शिवसेना

पैठण - विनायक हिवाळे - शिवसेना

भोकर - माधवराव किन्हाळकर - काँग्रेस

परभणी - आनंद भरोसे - काँग्रेस

औरंगाबाद मध्य - किशनचंद तनवाणी - शिवसेना

गंगापूर - प्रशांत बंब - अपक्ष

नांदेड दक्षिण - दिलीप कंदकुर्ते - काँग्रेस

उस्मानाबाद - संजय पाटील दुधगावकर - काँग्रेस

लातूर - शैलेश लाहोटी - काँग्रेस

कंधार - प्रताप पाटील चिखलीकर - राष्ट्रवादी

कन्नड - संजय गव्हाणे - समता परिषद

नांदगाव - अद्वय हिरे - जनराज्य

जालना - अरविंद चव्हाण - राष्ट्रवादी

बीड - विनायक मेटे - शिवसंग्राम

मुरबाड - किसनराव कथोरे - राष्ट्रवादी

बेलापूर - मंदा म्हात्रे - राष्ट्रवादी

घाटकोपर - राम कदम - मनसे

पनवेल - प्रशांत ठाकूर - काँग्रेस

शिराळा - शिवाजीराव नाईक - काँग्रेस

तासगाव - अजित घोरपडे - राष्ट्रवादी

घनसांगवी - विलासराव खरात - काँग्रेस

कोल्हापूर दक्षिण - अमल महाडिक - काँग्रेस

सावंतवाडी - राजन तेली - काँग्रेस

Follow @ibnlokmattv

First published: October 6, 2014, 4:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading