S M L

मोदी राज्यातले उद्योग गुजरातला पळवतायत -अजित पवार

Sachin Salve | Updated On: Oct 5, 2014 09:40 PM IST

मोदी राज्यातले उद्योग गुजरातला पळवतायत -अजित पवार

05 ऑक्टोबर : नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान असूनही महाराष्ट्राशी सूड भावनेने वागत आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली. तसंच मोदी हे राज्यातील उद्योग व्यवसाय गुजरातमध्ये नेण्याच्या प्रयत्नात आहेत, असा आरोपही पवारांनी केला. ते जळगावमध्ये बोलत होते.

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची आज (रविवारी) जळगावमध्ये सभा पार पडली. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. केंद्रात सत्ता मिळाल्यानंतर भाजपनं 100 दिवसांत काळा पैसा भारतात आणू असं आश्वासन दिलं होतं पण तो पैसा भारतात आणलाय का? याबाबत मात्र काय पावलं उचलली हेही कोणी सांगायला तयार नाही असा सवाल अजित पवारांनी मोदींना केलाय. तर हिर्‍याचा उद्योग, आरबीआय, रिझर्व्ह बँकेचं ऑफिस, मुंबई सारख्या राजधानीत असताना पंतप्रधान ते गुजरात मध्ये नेऊ पाहत आहेत अशा गंभीर आरोपही पवारांनी केला. गोपीनाथ मुंडे माझे लहान भाऊ आहेत असं ते म्हणतात पण त्यांचा अपघात झाल्यानंतर मोदी त्यांच्या अंत्यसंस्काराला येऊ शकतं नाही पण त्यांच्या नावाची सहानुभूती मिळवून मतदान मात्र मागत आहेत, बहुजन नेत्यांचा वापर मतांसाठी वापरायचा आणि नंतर त्यांना हीन दर्जाची वागणूक द्यायची ही भाजपची रणनीती आहे अशी जळजळीत टीकाही मोदींनी केली. संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम आम्ही महाराष्ट्रात 15 वर्षापुर्वी राबविली. पण पंतप्रधान मात्र गांधी जयंतीच्या दिवशी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवत आहेत आणि त्याचं मार्केटिंग करत ाहेत अशी टीकाही पवारांनी केली. मीही खासदार, आमदार, उपमुख्यमंत्री झालो आणि आईला भेटायला गेलो पण त्याचं कधी मार्केटिंग केलं नाही. मोदी मात्र आपल्या आईला भेटायला जातानाही त्याचं मार्केटिंग करतात अशी सडकून टीका अजित पवारांनी केली.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 5, 2014 07:10 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close