05 ऑक्टोबर : भारतीय क्रीडा क्षेत्रात आएमजी (IMG) रिलायन्स आणि स्टार इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने लवकरच इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेला सुरूवात होतेय. आज (रविवारी) मुंबईत या लीगच्या ट्रॉफीचं शानदार अनावरण झालं. मुंबईतील बीकेसी इथं हा
शानदार सोहळा पार पडला. या सोहळ्याला 8 टीम्सचे आयकॉन खेळाडू आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी यांची प्रमुख उपस्थिती होती. रिलायन्स फाऊंडेशनच्या चेअरमन नीता अंबानी आणि इतर मान्यवरांच्याहस्ते 28 ऑगस्टला मुंबईत या लीगचा शानदार लाँचिंग सोहळा पार पडला. या लीगमध्ये 8 शहरातील 8 टीम्सचा सहभाग आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, बॉलीवूड स्टार्स जॉन अब्राहम, रणबीर कपूर, सलमान खान आणि अभिषेक बच्चन यांच्यासारख्या युथ आयकॉन्सच्या मालकीच्या या टीम्स आहेत. 12 ऑक्टोबर ते 20 डिसेंबर दरम्यान या आयएसएलचा थरार आपल्याला अनुभवायला मिळणार आहे.
अशी आहे इंडियन सुपर लीग
या आहेत टीम
- ऍटलेटिको कोलकाता
- चेन्नई टायटन्स
- दिल्ली डायनामोज
- गोवा FC
- केरला ब्लास्टर्स
- मुंबई सिटी FC
- नॉर्थ ईस्ट युनायटेड
- पुणे सिटी FC
आएसएलचे टीम मालक
- ऍटलेटिको कोलकाता : सौरव गांगुली, ऍटलेटिको मादि्रद
- चेन्नई टायटन्स : अभिषेक बच्चन, इंटर मिलान
- दिल्ली डायनामोज : डेन नेटवर्क
- गोवा FC : वेणूगोपाल धूत, साळगांवकर, डेम्पो
- केरला ब्लास्टर्स : सचिन तेंडुलकर, PVP व्हेंचर्स
- मुंबई सिटी FC : रणबीर कपूर, बिमल पारेख
- नॉर्थ ईस्ट युनायटेड : जॉन अब्राहम, शिलाँग लजाँग
- पुणे सिटी FC : सलमान खान, वाधवान ग्रुप
असे रंगणार सामने
- प्रत्येक टीममध्ये 7 परदेशी प्लेअर्स
- प्रत्येक टीममध्ये 14 भारतीय प्लेअर्स
- प्रत्येक टीमला एक मार्की (आयकॉन) प्लेअर्स
- अंतिम 11 मध्ये सहा परदेशी खेळाडू
- अंतिम 11 मध्ये 5 भारतीय खेळाडू
- 12 ऑक्टोबर 2014 : ओपनिंग मॅच
- कोलकाता वि. मुंबई : पहिली मॅच : सॉल्ट लेक स्टेडियम