नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे

  • Share this:

narendra modi in beed04 ऑक्टोबर : बीडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विराट सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर सडकून टीका केली. राष्ट्रवादी हा भ्रष्टाचारवादी पक्ष आहे अशी टीका मोदींनी केली. मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे...

मोदींनी केली मराठीतून भाषणाला सुरूवात

हा विराट जनसागर गोपीनाथ मुंडेंच्या तपस्येचं फळ आहे -मोदी

गोपीनाथ मुंडे आज जर असते तर मला येण्याची गरज नसती -मोदी

आज गोपीनाथ मुंडे असते तर मला इथे यायचीही गरज नव्हती -मोदी

30 वर्षं त्यांच्यासोबत काम केलं -मोदी

गावाचा, गरिबांचा, शेतकर्‍यांचा कोणी विकास करेल तर गोपीनाथ मुंडे करतील असा मला विश्वास होता -मोदी

महाराष्ट्रातला बच्चा-बच्चा गोपीनाथ आहे-मोदी

सगळ्यांचा गरिबांचा विकास, मागासलेल्यांचा विकास हाच ध्यास आहे -मोदी

15 वर्षात काँग्रेस-राष्ट्रवादीनं एक पिढी बरबाद केली

आघाडी सरकारने गेल्या 15 वर्षात एक पिढी उद्‌ध्वस्त केली -मोदी

मुख्यमंत्री बनण्याची अनेकांची स्वप्नं पूर्ण झाली -मोदी

पण सर्वसामान्यांचं एकही स्वप्न पूर्ण झालं नाही -मोदी

महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले लोक दररोज कौन बनेगा अरबपती खेळत होते -मोदी

त्याचाच परिणाम म्हणजे महाराष्ट्र उद्‌ध्वस्त झाला -मोदी

गुजरातच्या तुलनेत महाराष्ट्र हा आमचा मोठा भाऊ आहे-मोदी

महाराष्ट्र आधीपासून मोठा होता-मोदी

पण आता नेमकं असं काय झालंय की तो वेगळ्या कारणांसाठी चर्चेत आहे -नरेंद्र मोदी

महाराष्ट्राची सत्ता अशा लोकांच्या हाती दिली ज्यांना स्वत:चीच काळजी जास्त होती-नरेंद्र मोदी

इथं घड्याळ आणि हाताची अभद्र युती होती -नरेंद्र मोदी

दोघांनी मिळून सर्व साफ करून टाकलंय -नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातले तरूण कर्जात बुडाले आहेत -नरेंद्र मोदी

मी आज तुमच्याही गोपीनाथ मुंडेंचा सहकारी होण्याच्या नात्यानं मागायला आलोय-मोदी

गोपीनाथ मुंडे माझे लहान भाऊ होते -मोदी

देशाचा विकास करायचा असेल तर महाराष्ट्राला वाचवायला हवं -मोदी

महाराष्ट्र देशाला आर्थिक गती देऊ शकतो- मोदी

15 वर्षात सर्व ठप्प झालंय, त्यात बदल करायचाय-मोदी

महाराष्ट्रात भाजपची स्थीर सरकार आहे -मोदी

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं गोत्र एकच आहे -मोदी

ही राष्ट्रवादी नसून भ्रष्टाचारवादी आहे -नरेंद्र मोदी

आपल्या जमीनीवर डल्ला मारणा-यांची गरज आहे का ? -मोदी

हे दंगली पसरवणारे लोक आपल्याला हवेत का? -मोदी

देशाला अशा लोकांपासून मुक्त करायचंय -मोदी

महाराष्ट्राला मला गुजरातच्या पुढे घेऊन जायाचंय- मोदी

ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी -मोदी

मी सामान्य माणूस आणि मी छोट्या-छोट्या माणसांचा विचार करतो -मोदी

त्यांची कामं करणं हा माझा उद्देश आहे -मोदी

संपूर्ण बहुमतांना सरकार आलं हे जगानं मानलं -मोदी

राज्यात पूर्ण बहुमतांचं सरकार आलं पाहिजे -मोदी

ज्या लोकांनी साठ वर्ष राज्य केलं ती मला 60 दिवसांत हिशेब मागताय -मोदी

60 महिन्याच्या आत मी देशाला अडचणींतून बाहेर काढेन हा वादा आहे -मोदी

चीन महाराष्ट्रात इंडस्ट्रियल पार्क बनवणार आहे -मोदी

मुंबई-अहमदाबाद हायस्पीड ट्रेनसाठी जपान मदत करणार आहे

राज्याची तिजोरी रिकामी असली तरी असलेल्या पैशाचा महाराष्ट्राचं भविष्य घडवू -मोदी

गोपीनाथ मुंडेंची कमी जाणू देणार नाही -मोदी

हायफाई चाहिये फायफाई चाहिये

सभा संपल्यानंतर जातांना आपण आणलेल्या पाण्याच्या बॉटल, पेपर कुठं टाकू नका -मोदींनी दिला स्वच्छतेचा नारा

Follow @ibnlokmattv

First published: October 4, 2014, 4:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading