04 ऑक्टोबर : इराकमध्ये इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया (आयसिस) या दहशतवादी संघटनेनं आता कौर्याची सीमा गाठली आहे. आयसिसने पुन्हा एका ब्रिटीश नागरिकाची हत्या केली आहे. ऍलन हेनिंग असं नागरिकांचं नाव आहे. ऍलन हेनिंगचं शिरच्छेद केलेला व्हिडिओ आयसिसने जारी केला आहे.
उत्तर इंग्लंडमध्ये राहणार्या ऍलन हेनिंगला मागली वर्षी सिरीयामध्ये बंदी केलं होतं. त्याच्या पत्नीने त्याच्या सुटकेसाठी ब्रिटीश सरकारकडे विनंती केली होती. इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरॉन यांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला असून हेनिंगच्या मारेकर्यांना कठोर शिक्षा देण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलंय.
धक्कादायक म्हणजे या अगोदरही आयसिसने ब्रिटिश नागरिक डेव्हिड हेन्सची अशाच पद्धतीने हत्या केली होती. त्याअगोदर अमेरिकन पत्रकार जेम्स फॉली आणि स्टिव्हन सोटलोफ यांचंही शिरच्छेद करणारा व्हिडिओ जारी केला होता. अमेरिकन सरकारने ब्रिटीश नागरिकाच्या हत्येबद्दल दुख व्यक्त केलंय.
Follow @ibnlokmattv |
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा