माझी लढाई कुठल्याही नेत्याशी नाही तर नियतीशी -पंकजा मुंडे

माझी लढाई कुठल्याही नेत्याशी नाही तर नियतीशी -पंकजा मुंडे

  • Share this:

pankaja03 सप्टेंबर : माझी लढाई आज कोणत्या पक्षाशी नाही आणि कुठल्या थातूरमातूर नेत्याशीही नाही. माझी लढाई नियतीशी आहे अशा भावना भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्यात. तसंच मी बुद्धीबळाच्या पटावरचा हत्ती आहे जो वजिरालाही चित करतो असंही त्यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलं. अहमदनगरमध्ये भगवान गडावर दसरा मेळावा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या.

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचे श्रद्धास्थान असलेल्या भगवानगडावर आज त्यांची मुलगी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली दसरा मेळावा पार पडला या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. यावेळी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाबांशिवाय मी इथे कधीही दर्शनाला आले नव्हते. जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी बाबा भगवानगडावर

दसर्‍याला यायचे पण आज मुंडेसाहेब नसल्यानं भगवानबाबांची समाधीही उदास वाटली. आज तुम्हा सर्व जण इथं आलात या गर्दीतून मला माझे बाबा दिसत आहे असे भावनाद्गार मुंडे यांनी काढले. माझी लढाई आज कोणत्या पक्षाशी नाही आणि ना कुठल्या थातूरमातूर नेत्याशीही नाही. माझी लढाईही नियतीशी आहे. मी आधीच चेहरा आहे, मला हटवून कुणाला काही साध्य होणार नाही त्यामुळे या सत्तास्थापनेत माझं योगदान कोणीच विसरणार नाही असंही मुंडे म्हणाल्यात. यावेळी त्यांनी नरेंद्र मोदींचं आभार मानले. माझा जो काही संघर्ष सुरू आहे हे सगळं नरेंद्र मोदी यांच्यासाठीच आहे. त्यांनी माझ्या वडिलांचा सन्मान केलाय. मोदींनी त्यांना ग्रामविकाससारखं लोकांशी निगडीत खातं दिलं होतं हे मी विसरू शकणार नाही असंही मुंडे म्हणाल्यात. या मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते. मेळाव्याला मुंडे समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. गर्दीला आवर घालण्यासाठी पोलिसांचीही मदत घ्यावी लागली.

भगवानगडावर पंकजा मुंडेंच्या भाषणातील ठळक मुद्दे

मुंडे समर्थकांची प्रचंड गर्दी

गोपीनाथ मुंडेंच्या जागवल्या आठवली

माझी लढाई पक्षाशी नाही

माझी लढाई नियतीशी आहे

मी कुठल्याही पदाची दावेदार नाही

निवडणुकीत माझं योगदान मोठं

विकासाचं राजकारण हवं

माझ्या यशाचे तुम्ही शिलेदार

पित्याची सर्व स्वप्न पूर्ण करणार

मुंडेंचा नाव जगाला विसरू देणार नाही

मतदारांना साथ देण्याचं केलं आवाहन

बळीचं राज्य आणण्याचं दिलं आश्वासन

Follow @ibnlokmattv

First published: October 3, 2014, 5:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading