रेल्वेचे तात्काळ तिकीट 50 टक्क्यांनी महागणार ?

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Oct 2, 2014 09:16 PM IST

756railway ticket price hike02 ऑक्टोबर : रेल्वेच्या महागडा प्रवास अगोदरच सहन करणार्‍या प्रवाशांना आता आणखी एक धक्का बसणार आहे. तुम्ही जर तात्काळ तिकीटाच्या भरवश्यावर असाल तर आता वेळेवर तिकीट काढून घ्या कारण तात्काळ रेल्वे प्रवासाचे तिकीट महागण्याची शक्यता आहे.

तात्काळ तिकीट तब्बल 50 टक्क्यांनी महागणार आहे. याबद्दलचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयानं क्षेत्रीय कार्यालयांना पाठवला आहे. पाच सर्वाधिक लोकप्रिय गाड्यांच्या तात्काळ किंमतीत वाढ करण्याचा असा हा प्रस्ताव आहे.

तात्काळ तिकीटाचे दर जरी वाढणार असले तरी ते काही ठराविक गाड्यांच्या तात्काळ भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे. चालू वर्षाच्या रेल्वे बजेटपुर्वीच लांबपल्ल्याच्या गाड्यांच्या प्रवासात वाढ करण्यात आली आहे. तसंच आरक्षित तिकीटांचे दरही वाढवण्यात आले आहे. त्यामुळे आता तात्काळ तिकीटांच्या दरात वाढ होणार असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना चांगलाच फटका बसणार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 2, 2014 09:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...