अजिंक्य व्हा, अतूट व्हा, मेरी कोम व्हा!

अजिंक्य व्हा, अतूट व्हा, मेरी कोम व्हा!

  • Share this:

priyanka chopra and mary kom01 ऑक्टोबर : येस, याला म्हणतात स्त्रीशक्ती! मेरी कोमला सुवर्णपदक मिळालंय आणि प्रयत्न केला तर आपण जे हवं ते मिळवू शकतो हे मेरीनं सिद्ध केलंय असं कौतुक मेरी कॉमची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने केलंय. मेरी, 3 मुलांची आई आहेस आणि तू खर्‍या अर्थानं चॅम्पियन आहेस. अजिंक्य व्हा, अतूट व्हा, मेरी कोम व्हा असंही प्रियांका म्हणाली. आशियाई क्रीडा स्पर्धेत मेरी कोमने आज सुवर्णपदकाची कमाई केलीये.

आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आजचा दिवस भारतासाठी सोन्याचा ठरला. भारताची सुवर्णकन्या मेरी कोमने तिच्यावर असलेल्या अपेक्षांची पूर्ती केलीये. बॉक्सिंगच्या 51 किलो वजनी गटात मेरी कोमने सुवर्ण पदकाची कमाई केली. फायनलमध्ये तिनं कझाकिस्तानच्या झायना

शेकरबेकोवाचा 2-0 असा पराभव केला. सुरुवातीला झायनानं आघाडी घेतली होती, मात्र मेरीने आपल्या कौशल्याने ऐतिहासिक विजय खेचून आणला. मेरी कोमच्या या यशामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताच्या खात्यात आतापर्यंत सात सुवर्णपदक जमा झाली आहेत. क्रमवारीतही सध्या भारत 10व्या स्थानी आहे. विशेष म्हणजे आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला पहिल्यांदाच बॉक्सिंगच्या महिला गटात गोल्ड मेडल मिळालंय. मेरी कोम सिनेमात प्रियांका चोप्राने मेरीची भूमिका साकारली होती. मेरीला मिळालेल्या यशाबद्दल तिनं ट्विट करून आपला आनंद व्यक्त केलाय आणि मेरीचं अभिनंदन केलंय. प्रियांका म्हणते, येस, याला म्हणतात स्त्रीशक्ती! मेरी कोमला सुवर्णपदक मिळालंय. आणि प्रयत्न केला तर आपण जे हवं ते मिळवू शकतो हे मेरीनं सिद्ध केलंय. मेरी, 3 मुलांची आई असलेली तू खर्‍या अर्थाने चॅम्पियन आहेस. अजिंक्य व्हा, अतूट व्हा, मेरी कोम व्हा! असा नाराही प्रियांकाने दिला.

Follow @ibnlokmattv

First published: October 1, 2014, 2:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading