विधानसभा निवडणुकीतही मोदी विरुद्ध गांधी

विधानसभा निवडणुकीतही मोदी विरुद्ध गांधी

 • Share this:

rahul vs modi54q

01 ऑक्टोबर  : लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही मोदी विरुद्ध गांधी असा सामना रंगणार आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी एकहाती सत्ता खेचून आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदीच भाजपचे महाराष्ट्रातले स्टार प्रचारक असणार आहेत. गेल्या 25 वर्षात भाजप पहिल्यांदाच आपला साथीदार शिवसेनेशिवाय निवडणुकीला सामोरी जात आहे त्यामुळे महाराष्ट्रात सत्ता जिंकून येण्याचं आव्हान भाजपसमोर आहे. महाराष्ट्रात भाजपच्या प्रचाराची भिस्त मोदींच्या सभांवरच असणार आहे. 4 ऑक्टोबरपासून ते प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 13 ऑक्टोबरपर्यंत मोदींच्या सभा होणार आहेत. 10 दिवसांत मोदींच्या एकून 22 सभांचं लक्ष्य भाजपनं ठेवलं आहे.

भाजपची 'मुलुखमैदान' तोफ

 • 4 ऑक्टोबरपासून मोदींचा प्रचार
 • मोदींची पहिली सभा कोल्हापूरमध्ये
 • मुंबईत रेसकोर्स मैैदानावर होणार सभा
 • कोल्हापूर आणि बीडमध्येही सभा
 • मोदींच्या दररोज 3 सभांची शक्यता
 • नितीन गडकरी संपूर्ण राज्यात घेणार सभा
 • अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींच्याही सभा
 • हेमा मालिनी, स्मृती इराणी, नवज्योतसिंग सिद्धू स्टार प्रचारक
 • सुषमा स्वराज, राजनाथ सिंह आणि अमित शहांच्याही सभा

लोकसभा निवडणुकीत पानिपत झाल्यानंतर काँग्रेसच्या दृष्टीनं विधानसभा निवडणूक महत्त्वाची आहे. राज्यात काँग्रेसचा प्रचार पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्त्वात होणार आहे. पण काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस राहुल गांधी हे काँग्रेसचे स्टार प्रचारक असतील, हे स्पष्ट आहे. 5 ऑक्टोबरनंतर सोनिया आणि राहुल यांच्या राज्यात सभा होणार आहेत. प्रचारादरम्यान ते पंतप्रधान मोदींना लक्ष्य करणार असल्याचंही सांगण्यात येत आहे.

काँग्रेसचे स्टार प्रचारक

 • काँग्रेसचा प्रचार पृथ्वीराज चव्हाणांच्या नेतृत्वात
 • राहुल आणि सोनिया गांधी स्टार प्रचारक
 • 5 ऑक्टोबरनंतर राहुल, सोनिया यांच्या सभा
 • 5 दिवस विभागवार प्रचारसभा
 • राहुल गांधींचा मुंबईसह इतर शहरांमध्ये रोड शो

Follow @ibnlokmattv

First published: October 1, 2014, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading