Elec-widget

भारतासाठी मेरी कोमची 'सुवर्ण' कमाई

भारतासाठी मेरी कोमची 'सुवर्ण' कमाई

  • Share this:

By2JLcBCMAImIsX

01 ऑक्टोबर  : एशियन गेम्समध्ये आजचा दिवस भारतासाठी सोन्याचा आहे. 17th एशियन गेम्समध्ये भारताची सुवर्णकन्या मेरी कोमनं बॉक्सिंगच्या महिलांच्या 51 किलो वजनी गटात गोल्ड मेडलची कमाई केली आहे. मेरीने फायनल मॅचमध्ये कझाकिस्तानच्या झायिना शेकेरबिकोवा हिचा 2-0 ने पराभव केला.

मेरीने सेमी फायनलमध्ये व्हिएतनामच्या ली थी बँगचा परभव करत फायलनमध्ये धडक मरली होती. फायनलमध्ये सुरुवातीला झायनानं आघाडी घेतली होती, मात्र मेरीनं आपल्या कौशल्यानं ऐतिहासिक विजय खेचून आणला. एशियन गेम्समध्ये भारताला मिळालेलं हे सात गोल्ड मेडल आहे तर बॉक्सिंगमध्ये भारताला पहिल्यांदाच गोल्ड मेडल मिळालं आहे. सध्या भारत 10व्या स्थानी आहे. भारताची सुवर्णकन्या मेरी कोमनं तिच्यावर असलेल्या अपेक्षांची पूर्ती केली आहे.

बॉक्सर विजेंदर सिंगनं मेरीचं अभिनंदन केलं आहे. मेरीच्या विजयानं आम्ही खूप खुष आहोत. मेरीनं 100 टक्के मेहनत करुन हे यश खेचून आणलंय अशी प्रतिक्रिया त्याने दिली आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्राचा ट्विट करून मेरीचं अभिनंदन केलं आहे. 'येस, याला म्हणतात स्त्रीशक्ती! मेरी कोमला सुवर्णपदक मिळालंय...आणि प्रयत्न केलं तर आपण जे हवं ते मिळवू शकतं हे मेरीनं सिद्ध केलंय..मेरी , 3 मुलांची आई असलेली तू खर्‍या अर्थानं चॅम्पियन आहेस. अजिंक्य बना, अतूट बना, मेरी कोम बना!'

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2014 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...