महादेव जानकर 'चव्वनी' छाप नेते - शिवसेना

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2014 03:25 PM IST

महादेव जानकर 'चव्वनी' छाप नेते - शिवसेना

Uddhav thakre jankar01 ऑक्टोबर :  पक्ष तिरडीवर गेला तरी चालेल, पण आम्हाला पदांचे गूळ-खोबरे मिळाले तरच समाजाचे कल्याण होईल असे घटक पक्षाच्या नेत्यांना वाटते, अशी टीका उद्धव ठाकरेंनी महादेव जानकरांवर केली आहे. महायुती तुटल्यानंतर शिवसेनेने महायुतीतल्या घटक पक्षांवर आता निशाणा साधला जात आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक 'सामना'मधून राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांवर टीका करण्यात आली आहे. त्यामध्ये महादेव जानकरांचा 'चव्वनी' छाप नेते असा उल्लेख करण्यात आला आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष भाजपासोबत गेल्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी यापूर्वी 'सामना'मधून आठवले आणि आता जानकरांना लक्ष केलं आहे.

शिवसेना आता एकाकी पडली आहे, सेनेची कोंडी झाली आहे, या चर्चेत तथ्य नाही. घटक पक्षाचे नेते गेले तरी सारा बहुजन समाज हा परंपरेने शिवसेनेबरोबरच आहे असा विश्वासही ठाकरेंनी या अग्रलेखात व्यक्त केला आहे. मात्र भाजपासोबत गेलेल्या 'चव्वनी' छाप पुढार्‍यांच्या हाती नक्की काय लागले? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. जानकरांच्या हातात भाजपाने पाचेक पडीक जागा ठेवल्या आहेत, यामुळे जानकर संतापले असले तरी आपण समाधानी आहोत, असेच ते दाखवत आहेत. स्वत:ला पदे मिळाली की समाजाचे कल्याण होईल असे वाटणार्‍या नेत्यांची मिरासदारी या निवडणुकीत मोडल्याशिवाय राहणार नाही, असंही ते म्हणाले.

काय म्हटलंय अग्रलेखात?

शेवटी आठवल्यांसारखाच अनुभव जानकरांनाही आलाच ना ? आठवल्यांना दिलेल्या जागांवरही भाजपने स्वत:चे उमेदवार घुसवले. जानकरांचेही तेच झाले. पक्ष तिरडीवर गेला तरी चालेल, पण आम्हाला पदांचे गूळ- खोबरे मिळाले तरच समाजाचे कल्याण होईल असे घटक पक्षाच्या नेतेमंडळींना वाटत आहे. महायुतीतील सर्व घटक पक्ष भाजपबरोबर पळून गेल्याने शिवसेनेची कोंडी झाली. शिवसेना एकाकी पडली असे बोलले जात आहे. त्यात अजिबात तथ्य नाही. घटक पक्षाचे नेते गेले, तरी सारा बहुजन समाज हा परंपरेने शिवसेनेबरोबरच आहे हे निवडणूक निकालांतून स्पष्ट होईल. पुन्हा स्वत:ला आपापल्या समाजाचे नेते म्हणवून घेणार्‍या 'चव्वनी' छाप पुढार्‍यांच्या हाती, नक्की काय लागले? हा संशोधनाचाच विषय आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2014 10:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...