डोंबिवलीजवळ लोकलचा डबा घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2014 01:56 PM IST

डोंबिवलीजवळ लोकलचा डबा घसरल्याने मध्य रेल्वे विस्कळीत

1216

30 सप्टेंबर : सिएसटीवरून टिटवाळ्याला जाणारी लोकल डोंबिवली स्टेशनजवळ घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

कल्याणच्या दिशेने जाणारी टिटवाळा लोकल डोंबिवली स्टेशन सोडताना सकाळी 11.30च्या सुमारास हा अपघात झाला. या मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यासाठी अजूनही 3 ते 4 तासांचा लगणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळेस्लो ट्रॅकवरील वाहतूक विस्कळीत झाली असून ती फास्ट ट्रॅकवर वळवण्यात आली आहे.दरम्यान रेल्वे कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून तासभरात वाहतूक पूर्वपदावर येईल असं सांगण्यात येत आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2014 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...