S M L

गुडबाय ऑर्कुट!, सोशल नेटवर्किंगमधून ऑर्कुटचं लॉग आऊट

Samruddha Bhambure | Updated On: Sep 30, 2014 11:00 AM IST

गुडबाय ऑर्कुट!, सोशल नेटवर्किंगमधून ऑर्कुटचं लॉग आऊट

30 सप्टेंबर : एकेकाळी तरुणांची प्रचंड लाडकी असलेली ऑर्कुट ही पहिली सोशल नेटवर्किंग वेबसाईट आजपासून बंद होते आहे. तुम्हाला शेवटचे ऑर्कुट अकाऊंट लॉग इन केलेले आठवतेय का? नाही ना... हेच कारण आहे गुगलने आपली पहिली सोशल नेटवर्किंग साइट ऑर्कुट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फेसबुक, ट्विटर यासारख्या नव्या सोशल नेटवर्किंग साईट्समुळे ऑर्कुटची लोकप्रियता कमी झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑर्कुटट हे नाव वाचूनच आजूनही अनेकजण नॉस्टॅल्जिक होतं असतील. प्रोफाईल, टेस्टिमोनियल्स, स्क्रॅप, वॉल अशा सगळ्या शब्दांमधून ऑर्कुटने सोशल नेटवर्किंगची ओळख करून दिली. 'ऑर्कुट'चं नाव ठेवण्यात आलं, या वेबसाईटचा जनक Orkut Büyükkökten वरून. गुगलच्या 'The 20 percent' प्रोजेक्टमधून 2004ला ऑर्कुटचा जन्म झाला. गुगलच्या प्रोजेक्टमध्ये कर्मचार्‍यांना त्यांच्या कामाचा 20 टक्के वेळ हा एखाद्या खास प्रोजेक्टसाठी वापरता येतो. त्यातूनच डेव्हलप झालेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे ऑर्कुट.

आता ऑर्कुट बंद करून गुगल आपलं लक्ष 'यू ट्यूब' आणि 'गुगल प्लसवर' केंदि्रत करणार आहे. 30 सप्टेंबरपासून म्हणजेचं आजपासून ऑर्कुट बंद होणार असल्याचं गुगलने जाहीर केलं आहे. गुगल रीडर पाठोपाठ बंद केली जाणारी ही गुगलची दुसरी साईट असेल. पहिली सोशल नेटवर्किंग साईट असल्याने अनेकांनी अजूनही आपले इथले अकाऊंट्स डिलीट केलेले नाहीत. अनेकजण फक्त जुन्या आठवणी म्हणून मधूनच कधीतरी हा अकाऊंट उघडून पाहतात. पण आता या सगळ्या डेटाचं काय? तर या सगळ्या डेटाचा बॅकअप तुम्हाला घेणं शक्य आहे.

    Loading...

  • ऑर्कुटला लॉग इन करायचं असेल, तर फार वर्षांपूवच्चा जुना पासवर्ड आठवत बसायची गरज नाही. आता गुगलचं एकच लॉगइन गुगलच्या सगळ्या सेवांसाठी चालतो. त्यामुळे तुमचं जीमेल लॉग इन वापरून तुम्हाला ऑर्कुट ऍक्सेस करता येईल.
  • ऑर्कुटवर असलेले तुमचे सगळे फोटो तुम्हाला गुगल प्लसवर एक्स्पोर्ट करता येतील
  • त्यासाठी गुगल प्लसला साईन इन करा (जीमेल आयडी वापरून)
  • http://www.orkut.com/AlbumsExport या लिंकवर जा.
  • जे अल्बम्स एक्स्पोर्ट करायचे असतील त्यावर क्लिक करा किंवा सिलेक्ट ऑलचा ऑप्शन क्लिक करा.
  • इम्पोर्ट सिलेक्टेडवर क्लिक करा.
  • तुम्ही इम्पोर्ट केलेले अल्बम्स बाय डिफॉल्ट ट प्रायव्हेट सेटिंगला असतील. म्हणजे इतर कोणालाही ते पाहता येणार नाहीत.
  • गुगल टेक आऊट सेवा वापरून तुम्हाला तुमचं ऑर्कुट प्रोफाईल, स्क्रॅप्स, टेस्टिमोनियल्स, आणि कम्युनिटी पोस्ट्स सेव्ह करता येतील.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 30, 2014 11:00 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close