मोदींनी न्यूयॉर्कमध्ये घेतली टॉप सीईओंची भेट

मोदींनी न्यूयॉर्कमध्ये घेतली टॉप सीईओंची भेट

  • Share this:

modi met business man29 सप्टेंबर : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची भेट घेण्याआधी नरेंद्र मोदींनी आज (सोमवारी) न्यूयॉर्कमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांच्या सीईओंची भेट घेतली. 'पेप्सी को'च्या सीईओ इंद्रा नूयी आणि मास्टर कार्डचे सीईओ अजय बंगा यांचीही त्यांनी भेट घेतली.

बोईंग, गोल्डमन सॅक्स, आयबीएम या कंपन्यांचे सीईओही या बैठकीत होते. थेट परकीय गुंतवणुकीबद्दल भारताची काय भूमिका आहे याबद्दल नरेंद्र मोदींनी या कंपन्यांच्या सीईओंजशी संवाद साधला. दरम्यान, पंतप्रधान आणि अमेरिकन सीईओ यांच्यात झालेल्या चर्चेत सुप्रीम कोर्टाने कोळसा खाणींचे वाटप रद्द करण्याच्या निर्णयाचा विषयही चर्चत आला. त्यावेळी पंतप्रधानांनी हा निर्णय म्हणजे सेटबॅक नाही तर संधी असल्याचं सांगितलं.

आता पारदर्शकपणे सर्व निर्णय घेतले जातील असं पंतप्रधानांनी स्पष्ट केलं. बोईंग कंपनीला भारतामध्ये उद्योग वाढवायचाय, असं या कंपनीचे सीईओ जेम्स मॅकनरने यांनी म्हटलंय. यानंतर आता मोदी वॉशिंग्टनमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांची भेट घेणार आहेत. ओबामांनी त्यांच्यासाठी प्रायव्हेट डिनर पार्टी आयोजित केलीय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन आणि माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन यांनाही ते भेटणार आहेत.

भारतीय लोकांचा उत्साह आणि सहभाग पाहून भारतीयांच्या वाढलेल्या प्रभावाचीही तिथल्या माध्यमांमध्ये जोरदार चर्चा होतेय.

'मोदी'सन स्क्वेअर

न्यूयॉर्क टाईम्स

- 'मोदी...मोदी' च्या घोषणा आणि ओसंडून वाहणार्‍या उत्साहात न्हाऊन निघालं मॅडिसन स्क्वेअर गार्डन

- मोदींनी आर्थिकदृष्टया विकसित होत असलेल्या भारताचं उत्तम मार्केटिंग केलंय.

द वॉशिग्टंन पोस्ट

- ज्या मोदींना एकेकाळी व्हिसा नाकारण्यात आला होता ते मॅडिसन स्क्वेअर गार्डनचे स्टार होते.

बीबीसी

- मॅडिसन स्क्वेअर बनलं नरेंद्र मोदींच्या अमेरिका भेटीचं केंद्र

यूएसए टुडे

- मोदींचं मॅडिसन स्क्वेअरमधलं भाषण व्हायब्रंट होतं. त्यांना जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यामुळे त्यांना रॉकस्टारचा दर्जा मिळणार आहे.

न्यूयॉर्क डेली न्यूज

- नरेंद्र मोदींचं जे भव्य स्वागत होतंय ते त्यांच्या आर्थिक सुधारणांच्या भूमिकेमुळे आणि कणखर नेतृत्वामुळे

द गाडिर्यन

नरेंद्र मोदींच्या करिष्म्याची न्यूयॉर्कवर भुरळ पडली. भारतीयांचा उत्साह ओसंडून वाहत होता.

टाईम

भारताच्या मोदींनी मॅडिसन सक्वेअर गार्डन व्यापून टाकलं.

Follow @ibnlokmattv

First published: September 29, 2014, 9:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading