पोटच्या मुलींची हत्या करून पित्याची आत्महत्या

पोटच्या मुलींची हत्या करून पित्याची आत्महत्या

  • Share this:

badlapur news29 सप्टेंबर : आपल्या पोटच्या दोन निरागस मुलींची हत्या करून पित्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बदलापूरमध्ये घडलीये. आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव पवन कुमार वर्मा असून (35) त्याची 6 वर्षाची मुलगी कोमल आणि 9 वर्षाची दुसरी मुलगी मिनल हे तीघेही फ्लॅटमध्ये मृत अवस्थेत आढळले.

पवन कुमार हा ठाणे येथील लोकमान्य नगर भागात राहणारा असून त्याने दीड महिन्या पुर्वीच बदलापूर येथील चामटोली भागात असणार्‍या पोद्दार एव्हर ग्रीन या पॉश गृहसंकुलात नवीन फ्लॅट घेतला होता. शनिवारी सकाळी पवन कुमार हा आपल्या दोन मुलींना घेउन बाहेर पडला तो बदलापुरला आपल्या फ्लॅटवर आला मात्र दोन दिवसांपासून पवन कुमार यांचा संपर्क होत नसल्याने घरच्यांनी मिसिंग ची तक्रार ठाणे वर्तकनगर पोलीस ठाण्यात केली होती .रविवारी पोलीस पवन कुमार याच्या पोद्दार एव्हरग्रीन सिटी येथील फ्लॅटवर पोहचले मात्र फ्लॅट उघडत नसल्याचे पाहून पोलिसांनी फ्लॅटचा दरवाजा तोडून आता गेले असता पवन कुमार हे गळ्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले तर कोमल आणि मिनल या सुद्धा मृत अवस्थेत दिसून आल्या. या दोघींचा गळा दाबून हत्या केली असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. पवन कुमार याने आत्महत्या करण्या पुर्वी आपल्या आत्महत्येस कोणाला दोषी धरू नये तसंच मी माझ्यासोबत माझ्या मुलीना घेऊन जात आहे. अशी चिट्टी ही लिहुन ठेवली आहे. पोलिसांनी तिन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्या असून पोलीस अधिक तपास करीत आहे. तसंच पवन कुमार यांनी आत्महत्या का केली याचा पोलीस शोध घेत आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2014 03:14 PM IST

ताज्या बातम्या