Elec-widget

वीरपत्नी कविता करकरेंचं निधन

वीरपत्नी कविता करकरेंचं निधन

  • Share this:

kavita karakare_news29 सप्टेंबर : मुंबईवर झालेल्या 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांचं निधन झालं.

मेंदूत रक्तस्राव झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. ब्रेन हॅमेरजमुळे रविवारी त्यांना माहिममधील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.उपचारादरम्यान त्या कोमात गेल्या होत्या. आज त्यांचं निधन झालं.

त्यांच्या पश्चात दोन मुली आणि एक मुलगा आहे. कविता करकरे यांच्या मृत्यूपश्च्यात अवयवदान करण्यात आलंय. त्यांच्या मुलींनी आणि मुलाने अवयवदान करण्याचा निर्णय घेतला होता.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 29, 2014 03:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...