एशियन गेम्स 2014 : कुस्तीमध्ये योगेश्वर दत्तनं पटकावलं गोल्ड मेडल

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2014 05:30 PM IST

एशियन गेम्स 2014 : कुस्तीमध्ये योगेश्वर दत्तनं पटकावलं गोल्ड मेडल

yogesgwardutt1-pti2809-630

28 सप्टेंबर : कुस्तीपटू योगेश्वर दत्तच्या 'गोल्डन' पंचमुळे भारताने एशियन गेम्समध्ये रविवारी सुवर्ण चौकार मारला आहे. कुस्तीमधल्या फ्री स्टाईल 65 किलो वजनीगटात योगेश्वरने ताजीकिस्तानच्या जालीम खानवर मात करत भारताला चौथे गोल्डन मेडल मिळवून दिले आहे. एशियन गेम्समध्ये तब्बल 28 वर्षांनी भारताला कुस्तीमध्ये गोल्डन मेडल मिळालं आहे.

एशियन गेम्समध्ये आज (रविवारी) नव्या दिवशाची सुरवात चांगली झाली असून, भारताला आणखीन एक सिल्व्हर मेडल मिळालं आहे. खुशबीर सिंगनं 20 किलोमीटर रेस वॉकमध्येसिल्व्हर मेडल पटकावलं आहे तर टेनिस डबल्समध्ये सानिया मिर्झा आणि प्रार्थना ठोंबरेंनी महिला गटातलं ब्राँझ मेडल जिंकलं. तसंच बॉक्सर मेरी कोम आणि सरिता देवी सेमीने फायनल्समध्ये धडक मारली आहे.

या चमकदार कामगिरीमुळे पदकतालिकेत भारत 4 गोल्डन, 5 सिल्व्हर आणि 24 ब्राँझ मेडल्ससह 8 व्या स्थानावर पोहोचला आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2014 05:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...