दादा आणि बाबांमुळे महाराष्ट्र खड्‌ड्यात गेला - नितीन गडकरी

दादा आणि बाबांमुळे महाराष्ट्र खड्‌ड्यात गेला - नितीन गडकरी

  • Share this:

nitin gadkari

28 सप्टेंबर :   महाराष्ट्रात वीज नसताना राज्यात उद्योगधंदे कुठून येणार आणि रोजगाराच्या नवीन संधी कशा निर्माण होणार असा सवाल उपस्थित करत दादा आणि बाबांमुळेच राज्य खड्‌ड्यात गेल्याची जोरदार टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि अजित पवार यांच्यावर केली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचाराचा नारळ फोडला. नंदुरबारमध्ये विजयकुमार गावित यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरींनी सभा घेतली. या सभेत गडकरींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर घणाघाती टीका केली. पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील आत्तापर्यंतचे सर्वात अकार्यक्षम मुख्यमंत्री असल्याची बोचरी टीका नितीन गडकरींनी केली. तर काँग्रेसनेच जातीयवादाचे विष कालवले असे सांगत गडकरींनी सोनिया गांधींवरही निशाणा साधला. तसचं महाराष्ट्रात शेतकर्‍यांनी आत्महत्या का केल्या असा सवाल गडकरींनी शरद पवार यांना विचारात आघाडीमुळेच राज्य दिवाळखोरीला निघाले असा आरोपही त्यांनी केला आहे.

आम्हाला विकासाचं राजकारण करायचं आहे, असं त्यांनी म्हटलं. सबका साथ, सबका विकास हे आमचं ध्येय असल्याचं ते म्हणाले. सर्वांना समान न्याय हेच भाजपचे सूत्र असून हिनासारख्या 100 आदिवासी मुलींनी डॉक्टर व्हावे यासाठी भाजप प्रयत्न करेल असे आश्वासनही त्यांनी दिले. आज दिवसभरात गडकरी उत्तर महाराष्ट्रात आणखी चार सभा घेणार आहेत. यासंपूर्ण सभेत गडकरींनी एकदाही शिवसेनेवर टीका केली नाही.

Follow @ibnlokmattv

First published: September 28, 2014, 2:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading