चव्हाणांचा राजीनामा स्वीकारला, तुर्तास काळजीवाहू मुख्यमंत्री

चव्हाणांचा राजीनामा स्वीकारला, तुर्तास काळजीवाहू मुख्यमंत्री

  • Share this:

cm on karad news27 सप्टेंबर : आघाडी सरकार अल्पमतात आल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मुख्यमंत्रीदाचा राजीनामा दिला होता. आज राज्यपाल विद्यासागर राव यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्विकारला आहे. पण पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पृथ्वीराज चव्हाण काळजीवाहू मुख्यमंत्री असतील. त्यामुळे तुर्तास राष्ट्रपती राजवट लागू होणार नाही.

गेल्या 15 वर्षांची आघाडी राष्ट्रवादी काँग्रेसने तोडली. आघाडीशी काडीमोड घेतल्यानंतर राष्ट्रवादीने काँग्रेसचा पाठिंबा काढून घेतला. एवढंच नाहीतर सर्व मंत्र्यांनी आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे देऊ केले आहेत. त्यामुळे सरकार अल्पमतात आलंय.

सरकार अल्पमतात आल्यानंतर भाजपचे विरोधीपक्ष नेते एकनाथ खडसे यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली होती. राष्ट्रवादीने पाठिंबा काढल्यानंतर अल्पमतात सरकार आल्यामुळे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

Follow @ibnlokmattv

First published: September 27, 2014, 6:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading