राष्ट्रवादीची यादी : ढोबळेंचा पत्ता कट, नेत्यांच्या नातेवाईकांना तिकीटांची खैरात

  • Share this:

laxaman dhoble26 सप्टेंबर : आघाडीतून बाहेर पडल्यानंतर राष्ट्रवादीने आपली 131 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पण आपल्या पहिल्याच यादीत राष्ट्रवादीने कात्री चालवलीये. राष्ट्रवादीने राजेंद्र शिंगणे, लक्ष्मण ढोबळे या माजी मंत्र्यांचे पत्ते कापले. तर विद्यमान आमदार पृथ्वीराज साठेंचाही पत्ता कापला. अकोलेमधून मधुकर पिचडांचा मुलगा वैभव पिचड यांना तिकीट देण्यात आलंय. तर केजमधून राष्ट्रवादीतर्फे नमिता मुंदडा तर दिवंगत माजी मंत्री विमल मुंदडा यांच्या सुनेला तिकीट देण्यात आलंय. तर पाटण (सातारा)मधून विक्रमसिंह पाटणकर यांचा मुलगा सत्यजित पाटणकर, श्रीवर्धनमधून सुनील तटकरेंचा पुतण्या अवधूत तटकरे यांनी उमेदवारी देत नातेवाईकांचा मान राखला आहेत. तसंच सांगली- इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे आणि कोल्हापूरच्या कागलमधून राष्ट्रवादीतर्फे हसन मुश्रीफ यांना तिकीट देण्यात आलंय.

राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीतील काही नावं

गुहागर - भास्कर जाधव

बीड - जयदत्त क्षीरसागर

आष्टी - सुरेश धस

बारामती - अजित पवार

आंबेगाव - दिलीप वळसे-पाटील

वरळी - सचिन अहिर

अकोले - वैभव पिचड

कळवा - जितेंद्र आव्हाड

सिंदखेडराजा - रेखा खेडेकर

मोहोळ - रमेश कदम

पाटण - सत्यजित पाटणकर

केज - नमिता मुंदडा

श्रीवर्धन - अवधूत तटकरे

चिखली - ध्रुपदराव सावळे

ठाणे - निरंजन डावखरे

निलंगा - बसवराज पाटील-नागराळकर

परळी - धनंजय मुंडे

श्रीगोंदा - राहुल जगताप

अहमदनगर शहर - संग्राम जगताप

इंदापूर - दत्ता भरणे

विक्रोळी - संजय दीना पाटील

गंगाखेड - मधुसूदन केंद्रे

कोरेगाव - शशिकांत शिंदे

सातारा - शिवेंद्रसिंह राजे भोसले

वसमत - जयप्रकाश दांडेगावकर

जिंतूर - विजय भांबळे

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2014 11:20 PM IST

ताज्या बातम्या