अमेरिका हा आमचा नैसर्गिक सहकारी -मोदी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 26, 2014 11:49 PM IST

अमेरिका हा आमचा नैसर्गिक सहकारी -मोदी

modi on obama26 सप्टेंबर : अमेरिका हा आमचा जागतिक नैसर्गिक सहकारी आहे. भारत आणि अमेरिकेनं नेहमीच दीर्घकालीन आणि जागतिक मूल्यांचं रक्षण केलंय.भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे एकमेकांच्या यशामध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे आशियाई-पॅसिफिक भागात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य दृढ करणं दोघांच्याही फायद्याचं आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलंय. अमेरिकेच्या 'वॉल स्ट्रीट जर्नल' या प्रसिद्ध दैनिकामध्ये लिहिलेल्या लेखात नरेंद्र मोदी यांनी भारत आणि अमेरिकेच्या संबंधांची चर्चा केली आहे.

काय लिहलंय या लेखात...

- इतिहास तपासून पाहिला तर भारतानं नेहमीच जगासाठी आपली दारं खुली ठेवलीेत. उद्योग-व्यवसाय, कल्पना, संशोधन, नवनवीन कल्पना आणि प्रवास या बाबींसाठी भारताचा नेहमीच मैत्रीचा दृष्टिकोन राहिलाय. अमेरिका हा आमचा जागतिक नैसर्गिक सहकारी आहे.

- भारत आणि अमेरिकेनं नेहमीच दीर्घकालीन आणि जागतिक मूल्यांचं रक्षण केलंय. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांचे एकमेकांच्या यशामध्ये हितसंबंध गुंतलेले आहेत. आशियाई-पॅसिफिक भागात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य दृढ करणं दोघांच्याही फायद्याचं आहे.

- दहशतवाद आणि उग्रवादाशी सामना करण्याचं अपूर्ण काम पूर्ण करायला लागेल. आमचे समुद्र, सायबर स्पेस आणि अवकाश सुरक्षित कराव्या लागतील. कारण या आमच्या दैनंदिन आयुष्यावर प्रभाव टाकणार्‍या गोष्टी आहेत.

Loading...

- तरुणांची ऊर्जा, उत्साह आणि उद्यमशीलता यांचा पुरेपूर वापर करून घेणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. त्यासाठी जुनाट कायदे आणि नियम रद्द केले जातील. नोकरशाही प्रक्रिया सुटसुटीत केली जाईल आणि सरकार अधिक पारदर्शक, प्रतिसाद देणारे असेल. विकास दरवाढीसाठी आणि नागरिकांच्या मूलभूत गरजा भागवण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. आमची शहरं आणि गावं स्मार्ट केली जातील. आमची खेडी आर्थिक कायापालटाची केंद्रं बनतील.

- माझ्या मते सर्वसमावेशक विकास म्हणजे कौशल्य-शिक्षण आणि संधी, समाजातल्या प्रत्येक घटकासाठी सुरक्षा, प्रतिष्ठा आणि हक्क, प्रत्येकाचं बँकेत खाते, प्रत्येकाला परवडणारी आरोग्य सुविधा, 2019पर्यंत सर्वांसाठी स्वच्छता, प्रत्येकाच्या डोक्यावर 2022पर्यंत छप्पर, प्रत्येक घरात वीज आणि प्रत्येक गावात रस्ते.

- सौर आणि पवन ऊर्जांच्या माध्यमातून हजारो गावांना विश्वासार्ह, परवडणारी आणि स्वच्छ ऊर्जा मिळेल. त्यासाठी त्यांना दूरवर मोठे, पारंपरिक ऊर्जा प्रकल्प उभारण्याची प्रतीक्षा करण्याची गरज नाही.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 26, 2014 09:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...