असा होता आघाडीचा प्रवास

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 25, 2014 09:26 PM IST

असा होता आघाडीचा प्रवास

sharad pawar and sonia gandhi news25 सप्टेंबर : आघाडीची 15 वर्षांचा संसार अखेर मोडलाय. शहकाटशाह, कुरघोडी, श्रेयाचं राजकारण एवढंच नाहीतर भ्रष्टाचाराचे आरोप आणि घोटाळे यावादातही एकमेकांवर बोटमोडून एकत्र राहिलेली आघाडी आज दुभंगली आहे. राष्ट्रवादीने स्वबळाचा नारा देत आज आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय. पण गेल्या 15 वर्षाच्या काळात दोनवेळा सत्तेची चवही राष्ट्रवादीला चाखायला मिळाली..या 15 वर्षाचा हा धावता आढावा...

- मे 1999 मध्ये सोनिया गांधींच्या परदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर

- मे 1999 मध्ये विश्‍वासू साथीदारांना बरोबर घेऊन शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची स्थापना

- मात्र, दोन्ही पक्ष राजकीयदृष्ट्या कायम एकमेकांच्या जवळच

- ऑक्टोबर 1999 मध्ये दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

Loading...

- काँग्रेसला 75 तर राष्ट्रवादीला 58 जागांवर यश, दोन्ही पक्षांची निकालानंतर आघाडी आणि सत्ता स्थापना

- 2004 मध्ये लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर यूपीएची स्थापना, राष्ट्रवादी सहभागी

- 2009, 2014 मध्ये राष्ट्रवादीने यूपीएचा घटक पक्ष म्हणून लोकसभा निवडणुकांच्या रिंगणात

- 2004 आणि 2009 मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही पक्षांची निवडणूकपूर्व आघाडी

- गेल्या 15 वर्षांच्या कालावधीत दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र, पण मतभेद कायम

- राज्यात मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे आणि महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे अशी व्यवस्था

- केंद्रात शरद पवार हे मनमोहन सिंग यांचे विश्वासू सहकारी

- सोनिया गांधी आणि शरद पवार यांचे सूर फारसे जुळले नाहीत, पण दोन्ही नेत्यांकडून आघाडी धर्माचं पालन

- दोन्ही नेत्यांच्या पुढच्या पिढीची महत्त्वाकांक्षी स्वप्नं

- राहुल गांधी यांचा देशभरात काँग्रेस पुनरुज्जीवनाचा नारा, त्यांत महाराष्ट्राचाही समावेश

- राज्यात अजित पवार नेहमीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत

- राहुल गांधी यांच्या खास विश्वासातले पृथ्वीराज चव्हाण राष्ट्रवादीचे विरोधक

- पृथ्वीराज चव्हाणांचे अजित पवारांवर अप्रत्यक्ष आरोप, अजित पवारांचा राजीनामा

- तिसर्‍या टर्ममध्ये दोन्ही पक्षांच्या कटुतेत वाढ

- मे 2014च्या लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचा 144 जागांवर दावा

- काँग्रेसकडून जास्तीत जास्त 124 जागा देण्याची तयारी

- 24 सप्टेंबर 2014 ला रात्री उशिरा काँग्रेसकडून 118 नावांची यादी जाहीर

- 25 सप्टेंबर 2014 काँग्रेस - राष्ट्रवादी तुटली

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2014 08:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...