अखेर महायुतीत महाफूट, 25 वर्षांची युती तुटली

अखेर महायुतीत महाफूट, 25 वर्षांची युती तुटली

  • Share this:

mahayuti tutli 3434

25 सप्टेंबर : युती तुटणार कि युती टिकणार...यावर काही दिवसांपासून चर्चा सुरू होती अखेरीस आज गेल्या 25 वर्षांपासूनचा युतीचा संसार तुटला आहे. भाजपने शिवसेनेशी घटस्फोट घेतला आहेत. घटकपक्षांना वार्‍यावर सोडता येत नाही, आमच्यामुळेच घटकपक्ष युतीत आले असं सांगत भाजपचे नेत्यांनी युती तुटली असं जाहीर केलंय. आम्ही युती टिकवण्याचा प्रयत्न केला पण शिवसेनेनं लवचिक भूमिका घेतली नाही त्यामुळे दुर्देवाने युती तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. युती जरी तुटली असली तरी राजू शेट्टी, विनायक मेटे, महादेव जानकर आपल्यासोबत आहे असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. या युतीच्या माध्यमातून निवडणुका लढवू असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, मातोश्रीवर शिवसेनेची बैठक बोलावण्यात आली आहे त्यानंतर शिवसेना आपली भूमिका मांडणार आहे.

दोन जीवलग मित्र....25 वर्षांपासूनची घट्ट मैत्री.. एक आक्रमक तर दुसरा मवाळ. राजकारणात अशी मैत्री दुर्मिळ....सुरुवातीचे दिवस दोनही मित्रांसाठी संघर्षाचे, चढउताराचे होते. सत्ता त्यांच्या स्वप्नातही नव्हती. पण नंतर सत्ता मिळत गेली. तसतशी या दोघांची सत्तेशीच गट्टी जमली आणि मैत्रीचे बंध विरत गेले. 1984 मध्ये मुंबई महापालिकेत भाजप - शिवसेना एकत्र होते. त्यात त्यांना यश आलं नाही आणि युती तुटली. 1985 मध्ये पुन्हा मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेनं स्वतंत्रपणे लढवली. याचवेळी भाजपने राज्यात शरद पवार प्रणित 'पुलोद' ला पाठिंबा दिला होता. नंतर 1987 राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर देशभरात वातावरण तापलं आणि हीच संधी साधत प्रमोद महाजन आणि लालकृष्ण अडवाणी यांनी भाजप- शिवसेनेला एकत्र आणलं आणि महाराष्ट्रात कमळ आणि धुनष्याच्या नव्या युतीचा जन्म झाला.

1989 मध्ये भाजप शिवसेनेनं लोकसभा निवडणूक एकत्र लढवली. 1990 मध्ये विधानसभा निवडणूकही ते एकत्र लढले आणि चांगलं यश मिळालं. गोपीनाथ मुंडेंची संघर्ष यात्रा, पवारांवरचे भूखंडाचे आरोप, मुंबईत झालेले बॉम्बस्फोट आणि रामजन्मभूमी या एकत्र वातावरणाचा फायदा घेत गोपीनाथ मुंडे बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजनांनी महाराष्ट्र ढवळून काढला. या झंझावातामुळे 1995 ला शिवसेना-भाजप युती 120 जागांवर विजय मिळवत अपक्षांच्या मदतीनं राज्यात पहिल्यांदा सत्तेवर आली. त्यानंतर केंद्रातही एनडीएचं सरकार आलं त्यात शिवसेनेलाही वाटा मिळाला. त्यावेळीही मनोहर जोशींच्या अवजड उद्योग खात्यावरून वादंग झाला, बाळासाहेबांनी नाराजी व्यक्त केली. पण या काळात युतीचे संकटमोचक होते.प्रमोद महाजन.

महाजनांनी मातोश्रीवर जायचं, बाळासाहेबांची भेट घ्यायची आणि नाराजीवर पडदा पडायचा. असे वादाचे प्रसंग अनेक वेळा आले. पण बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन या दिग्गज नेत्यांच्या व्यक्तिगत संबंधांमुळे युती शाबूत राहिली. पण 2006 मध्ये प्रमोद महाजनांची हत्या झाली आणि युतीमधला दुवा निखळला. नंतर महाजनांची जागा घेतली गोपीनाथ मुंडेंनी. याचवेळी दोन्ही पक्षांमध्ये सत्तेची सूत्रं पुढच्या पिढीकडे चालली होती..शिवसेनेत उद्धव ठाकरेंना सर्वाधिकार मिळाले. राज ठाकरेंनी नवा पक्ष काढला. तर भाजपमध्ये गडकरी मुंडे सत्तासंघर्ष वाढला. गोपीनाथ मुंडेंचं शिवसेनेशी सूत असलं तरी गडकरी आणि मातोश्रीमधले वाद वाढत गेले. युतीमधली दरीही वाढत गेली.

याचवेळी बाकीच्या पक्षांशी असलेले संबंधही मतभेदाला कारणीभूत ठरले. शरद पवार पंतप्रधान झाले तर आनंद वाटेल अशी भूमिका शिवसेनेनं घेतली, प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदासाठी पाठिंबा देण्यावरूनही ताणाताणी झाली. वेगळ्या विदर्भावरूनही मतदभेद होते आणि आहेत. नितीन गडकरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि गोपीनाथ मुंडेंचा गट राज्याच्या राजकारणातून बाजूला पडला. महायुतीतला तणाव वाढत गेला. पण यावेळी महाजनांनी उणीव भरून काढत गोपीनाथ मुंडेंनी घटकपक्षांनी सोबत घेत महायुतीची मोट बांधली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला नरेंद्र मोदींच्या लाटेत महायश मिळालं पण भाजपचे नेते गोपीनाथ मंुडेंचं अपघाती निधन झालं आणि महायुतीचा दुसरा दुवाही निखळला.

केंद्रात यश मिळाल्यामुळे विधानसभा निवडणुकीत विजय अगदी समोर होता. पण सत्तेवर जास्त हक्क कुणाचा..यावरून साठमारी सुरू झाली. एकीकडे महाराष्ट्र बाळासाहेबांची भूमी आहे, असं म्हणायचं आणि दुसरीकडे स्वबळावर जंगी सभा घ्यायच्या असं भाजपनं सुरू ठेवलं. शिवसेनेनंही एकट्याच्या बळावर शक्तिप्रदर्शन केलं. शिवसेना- भाजपच्या या वादामुळे मित्रपक्षही जेरीला आले. जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावरून भांडण विकोपाला गेलं. हिंदुत्व, काँग्रेस विरोध, विकासाचं राजकारण आणि यापेक्षा वरचढ ठरले ते अहंकार आणि सत्तेची लालसा .. हे दोन्हा पक्ष शहाणपणानं महायुती टिकेल. या सगळ्या शंका, आशा अपेक्षा इतक्या चर्चा करूनही धुळीला मिळाल्या आणि 25 वर्षांची ही अभेद्य अखेर तुटली.

भाजपची पत्रकार परिषद

देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत माहिती

सर्व घटकपक्ष आमच्यासोबत – देवेंद्र फडणवीस

रामदास आठवले, जानकर, राजू शेट्टी यांच्याशी रात्री बैठक होणार -फडणवीस

आमच्या मनातला भाव इतके वर्ष सोबत राहिलो – फडणवीस

 पण आम्हाला जे ध्येय गाठायचंय ते मित्रपक्षांना सोबत घेऊन गाठायचा प्रयत्न करू – फडणवीस

युती टिकवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला – फडणवीस

या महायुतीच्या माध्यमातून निवडणूका लढवू – फडणवीस

आमचं ध्येय कॉंग्रेस राष्ट्रवादीमुक्त महाराष्ट्र – फडणवीस

युती टिकवण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला – फडणवीस

शेवटचा प्रस्ताव घटक पक्षांना सात जागा – फडणवीस

मात्र भाजपनं प्रस्ताव अमान्य केला – फडणवीस

घटक पक्षांना वार्‍यावर सोडून युती करणं योग्य वाटत नाही – फडणवीस

शिवसेनेच्या प्रस्तावात लवचिकता नव्हती -फडणवीस

शेवटचा प्रस्ताव घटक पक्षांना सात जागा मात्र भाजपनं प्रस्ताव अमान्य केला -फडणवीस

सगळ्या चर्चा एका आकड्यापुरता -फडणवीस

जो निर्णय घेत असताना घटकपक्षांना सोबत ठेवावं ही भाजपची मागणी -फडणवीस

घटकपक्ष आमच्यावर विश्वास ठेवून महायुतीत -फडणवीस

एकनाथ खडसे यांची पत्रकार परिषदेत माहिती

गेले 20 -22 दिवस जागावाटपावर चर्चा सुरू

गेल्या 25 वर्षांपासून युती -खडसे

महायुतीने अनेक निवडणुका लढवल्यात

अनेक चढउतारांचा मी साक्षीदार – एकनाथ खडसे

गोपीनाथ मुंडेंनी युतीचं रुपांतर महायुतीत केलं – एकनाथ खडसे

शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदाभोवतीच चर्चा फिरवली – एकनाथ खडसे

आमचा प्राध्यान्य राज्याला – एकनाथ खडसे

आमच्या घटकपक्षांना आम्ही न्याय देऊ शकत नव्हतो – एकनाथ खडसे

युती टिकवण्याचा निर्णय केंद्रीय समितीनं कोअर कमिटीकडे सोपवला -खडसे

कुठल्यातरी निर्णयापर्यंत येण्यासाठी ही बैठक – खडसे

दुर्देवाने विशिष्ट एका आकड्या भोवती चर्चा फिरत राहिली

थोड्याच वेळात औपचारिक घोषणा, भाजपची पत्रकार परिषद सुरू

अखेर महायुतीत महाफूट,भाजपने घेतला महायुती तोडण्याचा निर्णय

अखेर महायुतीत महाफूट, 25 वर्षांची युती तुटली

भाजपने घेतला महायुती तोडण्याचा निर्णय

जानकर , खडसे , पंकजा मुंडे ,देवेंद्र फडणवीस पत्रकार परिषदेला हजर

महादेव जानकर यांची माहिती

- उद्धव ठाकरेंशी फोनवरुन चर्चा केली -महादेव जानकर

- तीनही घटक पक्ष भाजपसोबत-महादेव जानकर

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2014 06:39 PM IST

ताज्या बातम्या