काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर ठेवला 128 जागांचा नवा प्रस्ताव

काँग्रेसने राष्ट्रवादीसमोर ठेवला 128 जागांचा नवा प्रस्ताव

  • Share this:

pawar and cm53423424 सप्टेंबर : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीतही बिघाडी दूर करण्यासाठी काँग्रेसने राष्ट्रवादीला एक नवा प्रस्ताव दिला आहे. काँग्रेस राष्ट्रवादीला 128 जागा द्यायला तयार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

एवढचं नाहीतर वाढीव 14 मतदारसंघांची नावंसुद्धा राष्ट्रवादीला कळवली आहे. त्याशिवाय जागांच्या अदलाबदलीचा प्रस्तावही दिला असल्याचं समजतय. पण राष्ट्रवादीचे नेते कालपर्यंत वाढीव जागांच्या मागणीवर ठाम असताना काँग्रेसचा हा नवा प्रस्ताव ते मान्य करतं का हे पहावं लागणार आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आज सकाळी पुन्हा बोलावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या देवगिरी या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस अंतिम आणि आघाडी तोडण्याचा किंवा करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता अधिक आहे. आज सायंकाळपर्यंत याबाबत काहीतरी अधिकृत घोषणा केली जाऊ शकते.

Follow @ibnlokmattv

First published: September 24, 2014, 12:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading