अभिनव पर्व संपलं !

  • Share this:

Abhinav Bindra clinches gold23 सप्टेंबर : आशिया क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाज चांगली कामगिरी करत असतानाच, आज नेमबाज जगतानं एका अव्वल शूटरला अलविदा केला आहे. भारताचा एकमेव ऑलिम्पिक गोल्ड विजेता अभिनव बिंद्रानं आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून निवृत्ती घेतली आहे.

इंचिऑनमध्ये सुरू असलेले आशिया क्रीडा स्पर्धा ही त्याची शेवटची स्पर्धा ठरली. या स्पर्धेत अभिनवनं दोन मेडल्सची कमाई केली. पण त्याला ब्राँझ मेडलवरच समाधान मानावं लागलंय.

10 मीटर एअर रायफल प्रकारात अभिनवनं बीजिंग ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक गोल्ड पटकावून देत इतिहास रचला होता. तर कॉमनवेल्थ आणि वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये सुवर्णवेध घेत आंतरराष्ट्रीय स्तरावर गेलं एक दशक त्यानं आपला दबदबा कायम राखला होता. पण एशियन गेम्समध्ये अभिनवला गोल्ड मेडलनं हुलकावणी दिलीये. अभिनवच्या निवृत्तीमुळे भारतीय नेमबाद जगतातील एक पर्व संपलंय.

अभिनवचा प्रवास

ऑलिम्पिक :

2008 बीजिंग ऑलिम्पिक - गोल्ड

वर्ल्ड चॅम्पियनशिप :

2006 वर्ल्ड शूटिंग चॅम्पियनशिप - गोल्ड

कॉमनवेल्थ गेम्स :

2002 मॅनचेस्टर कॉमनवेल्थ (पेअर्स) - गोल्ड

2002 मॅनचेस्टर कॉमनवेल्थ - सिल्व्हर

2006 मेलबर्न कॉमनवेल्थ (पेअर्स) - गोल्ड

2006 मेलबर्न कॉमनवेल्थ - ब्राँझ

2010 दिल्ली कॉमनवेल्थ (पेअर्स) - गोल्ड

2010 दिल्ली कॉमनवेल्थ - सिल्व्हर

2014 ग्लासगो कॉमनवेल्थ - गोल्ड

Follow @ibnlokmattv

First published: September 23, 2014, 10:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading