असा असेल मंगळ प्रवेश !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2014 08:43 AM IST

असा असेल मंगळ प्रवेश !

mars orbiter24 सप्टेंबर : इस्रोचं मंगळयान आज मंगळाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. मिशन मार्सच्या शेवटच्या टप्प्यातील इंजिनाची चाचणी सोमवारी पूर्ण झालीय. मागील वर्षी 5 नोव्हेंबरला पीएसएलव्हीनं हे यान अंतराळात सोडलं होतं. त्यानंतर मंगळयानाचा प्रवास कसा झाला याबद्दलचा हा आढावा...

पीएसएलव्हीनं मंगळयानाला अंतराळात सोडलं आणि मंगळयानाने पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला सुरूवात केली. यानंतरचा प्रवास या यानासाठी महत्वाचा होता. हे आव्हानही इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी पेललं आणि पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडत मंगळयान मंगळाच्या दिशेने झेपावलं.

शास्त्रज्ञ सुरेश नाईक सांगतात, मंगळयानाचा वेग वाढवत वाढवत नेला आणि मग त्याला पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर काढत सूर्याच्या कक्षेमध्ये टाकलं.

मंगळयान सध्या सूर्याभोवतीच्या कक्षेमध्ये फिरतंय. मंगळाच्या जवळ पोहोचल्यानंतर ते मंगळाच्या गुरुत्वाकर्षणाचा आधार घेत ते या कक्षेमध्ये शिरणं अपेक्षित आहे. आणि हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे. सध्याची परिस्थीती तरी ऑल ईज वेल असल्याचं इस्त्रोचे शास्त्रज्ञ सांगतायत.

24 तारखेला अगदी भल्या पहाटे मंगळाच्या कक्षेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न मंगळयान करणार आहे. सकाळी 7.30 च्या सुमारास ते मंगळाभोवती फिरायला लागेल अशी शक्यता आहे.

Loading...

आतापर्यंत युरोपीयन स्पेस एजन्सीचंच यान पहिल्या प्रयत्नामध्ये मंगळापर्यंत पोहचू शकलं आहे. नासा युरोपीयन स्पेस एजन्सी आणि सोव्हीयत युनियनचेच मंगळावर यान पाठवण्याचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत. त्यामुळे मंगळयान पोहोचलं तर भारत पहिल्या प्रयत्नात यशस्वी होणारा दुसरा देश ठरू शकणार आहे.

मंगळयान मंगळाच्या कक्षेत पोहोचलं की, नाही याची माहिती कंट्रोलरुममध्ये पोहोचायला सकाळी 9 पर्यंत वाट पहावी लागणार आहे. या मंगळयानाकडे देशातल्याच नाही तर परदेशातल्याही अनेक लोकांचं लक्ष लागलं आहे.

असा असेल मंगळ प्रवेश !

पहाटे 4 वा. 17 मि. - मंगळाच्या कक्षेत प्रवेशाला सुरुवात

सकाळी 6 वा. 56 मि. - यानाला योग्य दिशेने वळवण्याच्या प्रक्रियेला सुरुवात

 7 वा. 12 मि. - मंगळयान मंगळाच्या पलीकडच्या बाजूला जायला सुरुवात

 7 वा. 17 मि. - लिक्विड इंजिन प्रज्वलित होणार

 7 वा. 21 मि. - पृथ्वी आणि मंगळयानाच्या मध्ये मंगळ येणार

 7 वा. 22 मि. - मंगळयान आणि इस्रोच्या कंट्रोल रूमचा संपर्क तुटणार

 7 वा. 30 मि. - इंजिन प्रज्वलित झाल्याची खात्री होणार

 7 वा. 41 मि. - लिक्विड इंजिन बंद होणार

 7 वा. 52 मि. - मंगळयान मंगळाच्या नियोजित कक्षेत फिरायला सुरुवात होणार

 8 वा. 30 मि. - मंगळयानाकडून सिग्नल येणार

 24 तासांच्या आत मंगळयान मंगळाची माहिती पाठवायला सुरुवात करणार

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2014 07:32 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...