प्रादेशिक युद्ध जिंकण्याची तयारी करा- शी जिनफिंग

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 23, 2014 03:35 PM IST

प्रादेशिक युद्ध जिंकण्याची तयारी करा- शी जिनफिंग

Jhimping

23 सप्टेंबर :   प्रादेशिक युद्ध जिंकण्यासाठी तयारी करा असे आदेश चीनचे अध्यक्ष शी जिनफिंग यांनी लष्करांना दिले आहेत. लडाखमधल्या चुमारमध्ये चीनी फौजा गेल्या 12 दिवसांपासून तळ ठोकून आहेत. त्यामुळे अजूनही तणाव कायम आहे. याच पार्श्वभूमीवर लष्करप्रमुख दलबीर सुहाग यांनी त्यांचा भूतान दौरा रद्द केला आहे. ते आजपासून चार दिवसांच्या भूतान दौर्‍यावर जाणार होते. काल चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने भारतीय हद्दीमध्ये सात नवे तंबू ठोकले आहेत. भारतीय लष्कराकडून वारंवार इशारा मिळूनही चीनी फौजा मागे हटत नाही आहेत. शनिवारी 50 चीनी जवान चुमारमध्ये घुसले आहेत. काही दिवसांपूर्वी 100 तुकड्यांनी भारतीय हद्द ओलांडली होती. दरम्यान, चीनचे अध्यक्ष शी जीनफिंग यांनी काही दिवसांपूर्वीच भारत भेटी दिली होती. त्यामध्ये त्यांनी सीमावादाच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली होती पण तरीही चीनकडून आगळीक सुरूच आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 23, 2014 12:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...