खबरदार !, मतदाराजाला 'बाटली'चं आमिष द्यालं तर...

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2014 09:15 PM IST

खबरदार !, मतदाराजाला 'बाटली'चं आमिष द्यालं तर...

drink vote20 सप्टेंबर : निवडणूक आली की सर्वच राजकीय पक्षांना मतदारराजाचा पुळका येतो. मग मतदारराजाला कसं आकर्षित करणार यासाठी नाना फंडे वापरले जातात. त्यातच 'बाटली आणि कोंबडी' हा प्रयोग्य गावपातळीपासून शहरापर्यंत सर्रास वापरला जातो. पण खबरदार आता जर असा प्रयत्न चुकूनही करणार असाल तर निवडणूक आयोगाची करडी नजर तुमच्यावर असणार आहे.

विधानसभा निवडणुकीत दारूचा गैरवापर टाळण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने कडक नजर ठेवली जाणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये दारू दुकानदारांनी गेल्या वर्षी किती दारू विकली आणि यावर्षी किती दारू विकली हे तपासलं जाणार आहे. यात जर 50 टक्क्यांपेक्षा आढळला, तर कारवाई केली जाणार आहे. 50 टक्के वाढ ही नैसर्गिक वाढ आहे पण यापेक्षा जास्त दारू ही वेगळया कामासाठी वापरली जाण्याचा विभागाला संशय आहे. दारुच्या स्टॉकिस्ट आणि होलसेलर्सना सीसीटीव्ही लावणं बंधनकारक करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाला या सर्व कारवाईचा रिपोर्टही उत्पादन शुल्क विभागाला पाठवावा लागणार आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2014 08:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...