कोणता हा झेंडा घेऊ हाती !

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 20, 2014 08:49 PM IST

कोणता हा झेंडा घेऊ हाती !

party flag20 सप्टेंबर : 'कोणता हा झेंडा घेऊ हाती' अशी अवस्था आता कार्यकर्त्यांची झालीय. सर्वच पक्षांचं जागावाटपाचं गुर्‍हाळ सुरूच आहे. मतदानाला महिन्याभरापेक्षाही कमी वेळ राहिलाय. जागावाटपाच्या घोळामुळे अजून उमेदवारी अर्ज दाखल झालेले नाहीत.

त्यामुळे नेमका कोणाचा प्रचार करायचा असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडलाय. त्यामुळे स्थानिक पातळीवरची पक्ष कार्यालयं ओस पडली आहेत. वर्ध्यात तर भाजप-शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे या सर्वच पक्षांची कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसतोय.

दिल्लीपासून मुंबईपर्यंत जागावाटपांच्या चर्चांचं गु-हाळ सुरू आहे. महायुतीतला तिढा संपायचं नाव घेत नाही तर आघाडीतही अजून बिघाडी कायम आहे. मतदानाला आता एक महिन्यापेक्षा कमी वेळ उरला असतानाही जागावाटपाच्या घोळामुळे अजून उमेदवारी अर्जही दाखल झालेले नाहीत. त्यामुळे नेमका उमेदवार कोण आणि कुणाचा प्रचार करायचा या संभ्रमात कार्यकर्ते सापडले आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांच्या

स्थानिक पातळीवरची कार्यालयांत शुकशुकाट दिसून येतोय. वर्ध्यात तर याचं बोलकं उदाहरण समोर आलंय. शहरातील प्रमुख पक्षांची कार्यालयं ओस पडली आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना कार्यालयात कार्यकर्तेच दिसत नाहीत. कारण प्रचार कुणाचा करायचा अशा संभ्रमात ते सापडले आहेत. आता ते वाट बघतायत ते मुंबईहून येणार्‍या आदेशाची...

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 20, 2014 08:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...