News18 Lokmat

'याचं काय करायचं..?'

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 19, 2014 06:37 PM IST

'याचं काय करायचं..?'

party workers19 सप्टेंबर : 'याचं काय करायचं...?' अभिनेते नंदू माधव दिग्दर्शित आणि शाहीर संभाजी भगत लिखित 'शिवाजी इन भीमनगर मोहल्ला अंडरग्राऊंड' या नाटकात पक्षाचे दोन कार्यकर्ते 'झेंडा आणि तलवार' हातात घेऊन संपूर्ण नाटकभर सैरभैर पळत असता कारण ते कुठे फेकून देता येत नाही मात्र ते कुठे ठेवताही येत नाही त्यामुळे ते एकच विचारता 'याचं काय करायचं' अशीच अवस्था आता आघाडी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांची झालीये.

महायुती असो अथवा आघाडी दोन्ही ठिकाणी जागावाटपाचा घोळ कायम असल्यानं सर्वच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. विशेष म्हणजे उद्यापासून अर्ज भरायला सुरवात होतेय आणि निर्णय लवकरच घेण्यासाठी नेत्यांवर दबाव आणला जातोय. 15 ऑक्टोंबरला मतदान होणार असल्याने प्रचारासाठी उमेदवारांकडे एक महिन्यांपेक्षाही कमी वेळ शिल्लक आहे. मात्र अजूनही महायुती आणि आघाडीचा जागावाटपाचा घोळ सुटत नसल्यानं सर्वच पक्षांचे कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. प्रचाराचं प्लॅनिंग कसं करायचं असा त्याच्यापुढचा प्रश्न असून, जागावाटप लवकर करा असा आग्रह कार्यकर्त्यांनी आपल्या हायकमांडकडे धरला आहे. युतीच्या जागावाटपाचा निर्णय होत नसल्यामुळे शिवसैनिकांचा जीव टांगणीला लागलाय. जागावाटपाचं काय होतं आपण स्वबळावर लढणार आहोत का ? यासाठी शिवसैनिकांची नजर मातोश्रीकडे लागली आहे. आघाडीत गेल्या महिन्याभरापासून चर्चेचं गुर्‍हाळ सुरूच आहे तर दुसरीकडे प्रचाराचं नारळं फोडण्यात आलंय पण जागावाटपचं झालं नाही आणि नेते दुसरीकडे स्वबळाची भाषा बोलत आहे त्यामुळे संभ्रम कायम आहे. एकंदरीतच 'याचं काय करायचं..?' अशी अवस्था कार्यकर्त्यांची झालीये.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 19, 2014 06:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...