Elec-widget

भाजप नरमली, युती तुटणार नाही !

भाजप नरमली, युती तुटणार नाही !

  • Share this:

khadse mungantiwar19 सप्टेंबर : युती तुटणार की टिकणार यावरून सुरू असलेलं महायुद्ध तुर्तास तरी शांत झालंय. भाजपने एक पाऊल मागे घेत युती तुटणार नाही असं स्पष्ट केलंय. महायुती टिकावी ही आमची भावना आहे. 119 जागांचा प्रस्ताव हा जुनाच आहे आम्ही आमचं मत अधिकृतपणे

शिवसेनेला प्रस्ताव पाठवून सांगणार असं भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं. तर मुख्यमंत्री कोण हे आता आमच्यासाठी महत्त्वाचं नाही. महायुती म्हणून पुढे जायला हवं हा आमचा विचार आहे असं एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. मुनगंटीवार आणि खडसे यांनी एकत्र पत्रकार परिषद घेऊन भाजपची भूमिका मांडली.

गेल्या दोन दिवसांपासून महायुतीत जागवाटपावरून चांगलाच वाद पेटलाय. गेल्या 25 वर्षांपासूनची युती तुटण्याची चर्चाच सुरू झालीये. मात्र याबाबत शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांनी चुपी साधली आहे. एकीकडे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा युतीचा उल्लेख टाळत आहे. तर भाजप 'शिवछत्रपती का आशीर्वाद चलो चलें मोदी के साथ' अशी होर्डिंग झळकवत आहे. तर दुसरीकडे सेनेनंही युतीच्या निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवले आहे. मात्र युतीच्या या वादात घडक पक्ष भरडले जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जागा कमी पडत असल्यास आमच्या जागा घ्या पण युती तोडू नका असं आवाहन केलंय. दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार, एकनाथ खडसे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युती तुटणार नाही असं स्पष्ट केलं.

भाजपनं नेहमीच संयमाची भूमिका घेत युती टिकवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येक प्रसंगी भाजपनं नमतं घेतलंय. महायुती टिकवण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत आलोय त्यामुळे महायुती टिकावी ही आमची भावना आहे असं मुनगंटीवार म्हणाले. जागांच्या बाबतीत 119 चा प्रस्ताव हा जुनाच त्यामुळे तो स्वीकारण्याचा प्रश्नच नाही. आजपर्यंत शिवसेनेनं 59 जागा कधीच जिंकल्या नाहीत. त्यामुळे प्रत्येक जागेचा निकष हा जिंकण्याबाबत असावा असावा. महायुती टिकली पाहिजे, कायम झाली पाहिजे वाद जरी असला तरी चर्चा झाली पाहिजे. कोणताही वाद न होता कार्यकर्त्यांचा आणि जनतेचा सन्मान आणि समाधान झालं पाहिजे असंही ते म्हणाले.

त्याचबरोबर आम्ही आमचं मत अधिकृतपणे शिवसेनेला प्रस्ताव पाठवून सांगणार असंही त्यांनी स्पष्ट केलं. शरद पवारांनी पंतप्रधान व्हावं असं जेव्हा शिवसेनेनं म्हटलं तेव्हावी आम्ही संयम राखला होता, मराठीच्या मुद्द्यावर प्रतिभा पाटलांच्या बाजूने मतदान केलं तेव्हाही आम्ही नमतं घेतलं. प्रणव मुखजीर्ंना शिवसेनेला साथ दिली तेव्हाही आम्ही मन मोठं केलं अशी आठवणही मुनगंटीवार यांनी सेनेला करून दिली.

Loading...

महायुतीचा धर्म भाजपने पाळलाय. आम्ही रामदास आठवलेंनाही जागा दिली. भाजपनं युती टिकवण्यासाठी लोकसभेच्या 7 जागा दिल्या पण विधानसभेसाठी आम्हाला शिवसेनेकडून एकही जागा नाही असा सवाल खडसे यांनी उपस्थित केला. ज्या जागा कधी आपल्याला जिंकता आल्या नाहीत त्याच जागांवर चर्चा व्हावी ही आमची भूमिका आहे. भाजपनंच केवळ त्याग करावा ही भूमिका आमच्या कार्यकर्त्यांना मान्य नाही असंही एकनाथ खडसेंनी सुनावलं.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 19, 2014 07:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...