News18 Lokmat

जनतेला गृहित धरू नका- शिवसेना

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 17, 2014 03:53 PM IST

Uddhav-650

17 सप्टेंबर :  नऊ राज्यांतील पोटनिवडणुकांचे निकाल हा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांसाठी धडा आहे असे सांगत जनतेला गृहित धरू नका, असा सूचक सल्ला शिवसेनेने दै.सामनाच्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे. लोकसभेच्या 3 आणि विधानसभेच्या 33 जागांसाठी, 9 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला चांगलाच धक्का बसला आहे. देशातून मोदी लाट ओसरली का अशा चर्चा रंगत आहेत. आधीच शिवसेना आणि भाजपमध्ये जागावाटपावरून तणाव निर्माण झाला आहे आणि त्यातच  शिवसेनेनेही भाजपला चार शब्द ऐकवण्याची संधी सोडलेली नाही.

पोटनिवडणुकांत गुजरातवगळता बाकी सर्व जागांवर भाजपला मोठा धक्का बसला असून मोदींची ओसरल्याचे चित्र दिसत आहे. त्यात महाराष्ट्रात होणार्‍या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेनेत जागावाटपाचा तिढा अजूनही कायम आहे. लोकसेभेच्या यशानंतर जास्त जागांची मागणी करणार्‍या भाजपला, शिवसेनेने साफ नकार दिला आहे. त्यामुळे भाजपमधून सध्या नाराजी व्यक्त होत आहे. पोटनिवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने भाजपला खडे बोल सुनावले आहेत. 'लोकसभेच्या हवेवर विधानसभा लढता येणार नाहीत' असे सांगत उद्धव ठाकरेंनी भाजपाला वेळीच सावध होण्याचा सल्ला दिला आहे. जनतेला गृहित धरल्यास हीच जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल, असा इशाराही अग्रलेखात देण्यात आला आहे.

काय म्हटलंय अग्रलेखात...

लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपने जोरदार मुसंडी मारली होती. मात्र आता त्याच उत्तर प्रदेशात पोटनिवडणुकांचे निकाल नेमके उलटे लागले आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी हा धडा आहे, तो सगळ्यांसाठीच आहे. जनतेला गृहीत धरू नका. विजयाचा उन्माद चढू देऊ नका आणि हवेवर स्वार होऊन तलवारबाजी करू नका. हा धडा जे घेतील तेच महाराष्ट्र काबीज करतील. नाहीतर जनता उलटे सुलटे करून सालटी काढेल.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 17, 2014 11:09 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...