शिवसेनेनं बोलावली 'सुभेदारांची' तातडीने बैठक

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2014 11:28 PM IST

1udhav_thakarey_pune 16 सप्टेंबर : विधानसभा पोटनिवडणुकींच्या निकालानंतर आता शिवसेनाही आक्रमक झाली आहे. शिवसेनेनं उद्या (मंगळवारी) सर्व जिल्हा आणि तालुका प्रमुखांची मुंबईत 'मातोश्री'वर तातडीची बैठक बोलवली आहे.

विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा उद्या मुंबईत येणार आहे. अशावेळी शिवसेनेनं ही बैठक बोलावली असून त्यामुळे हा भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे की शिवसेनाही स्वबळ आजमावून बघतेय, अशी चर्चा सुरू झालीये.

 दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी भाजपची 135 जागेची मागणी धुडकावून लावली होती. भाजपला जागा वाढवून देणं अशक्य आहे पण युती तुटू देणार नाही असं कोणतंही पाऊल उचलणार नाही असं सुचकं वक्तव्यही केलं होतं.

पण आज 9 राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत मोदी लाट ओसरल्याचं चित्र आहे. राज्यात एकीकडे आघाडीने प्रचाराला प्रारंभ केला मात्र महायुतीची प्रचाराचा गाडी अजूनही जागावाटपामुळे अडकलेली आहे. आता उद्या शिवसेना या बैठकीत काय निर्णय घेते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2014 11:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...