News18 Lokmat

'होय, मी एक महिला आहे' तुम्हाला काही अडचण?, दीपिकाचं 'त्यांना' सडेतोड उत्तर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 15, 2014 11:30 PM IST

'होय, मी एक महिला आहे' तुम्हाला काही अडचण?, दीपिकाचं 'त्यांना' सडेतोड उत्तर

deepika15 सप्टेंबर : बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोणने एका इंग्रजी दैनिकाविरोधात ट्विटरवरून आवाज उठवलाय. दीपिकाने थेट या दैनिकांच्या विरोधात ट्विटरवर जंगच छेडली आहे.

त्याचं झालं असं की, एका कार्यक्रमात दीपिका पदुकोणनं घातलेल्या ड्रेसबद्दल या दैनिकानं ट्विटर अकाऊंटवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. त्यामुळे दीपिका चांगलीच संतापली. 'होय, मी एक महिला असून मला ब्रेस्ट आणि क्लीवेज आहे' तुम्हाला काही अडचण ? असं सणसणीत उत्तर दिलंय. दीपिकाचा राग एवढ्यावर अनावर झाला नाही. तुम्हाला जर महिलांचा आदर करता येत नसेल तर महिलांच्या सक्षमीकरणावर बोलू नका, असंही दीपिकाने सुनावलं.

सदैव प्रसिद्धीसाठी हापापलेल्या कलाकारांच्या पंक्तीत न बसता दीपिकाने सडेतोड उत्तर दिल्यामुळे बॉलिवूडच्या अन्य कलाकारांनीही तीची पाठराखण केली. अभिनेत्री विद्या बालन, प्रियांका चोप्रा, नेहा धुपिया यांनी दीपिकाची पाठराखण केली. तर बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खाननेही दीपिकाची पाठ थोपाटली. दीपिकाएवढी हिंमत आमच्याकडे नाही, पण आमचा तिला पाठिंबा आहे, असं शाहरुख खाननं म्हटलंय.

Loading...

 

एका प्रसिद्ध इंग्रजी दैनिकांकडून हा प्रकार रविवारी घडला. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंट एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्याखाली वाक्य लिहिलं 'ओह माय गॉड, दीपिका पदुकोण क्लीवेज शो!' या दैनिकांने या व्हिडिओला महत्व देत ट्विट केलं. त्यामुळेच दीपिका भडकली. एक वर्षापूर्वी दीपिका 'चेनई एक्स्प्रेस' या सिनेमाचं ट्रेलर लाँच करण्यासाठी पोहचली होती त्यादरम्यान हे फोटो टिप्पली गेली होती.

 

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 15, 2014 09:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...