येवल्यात स्वाईन फ्लूने पोलीस पाटलाचा मृत्यू

येवल्यात स्वाईन फ्लूने पोलीस पाटलाचा मृत्यू

  • Share this:

nashik yevala15 सप्टेंबर : नाशिकच्या येवला तालुक्यात एका पोलीस पाटलाचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. बाजीराव चव्हाण असं त्यांचं नाव होतं. त्यांच्या मृत्यूमुळे या भागात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

बाजीराव चव्हाण याचा नाशिकच्या खाजगी रुग्णालयात स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. या घटनेनंतर शासकीय यंत्रणाही खडबडून जागी झालीय आणि त्यांनी या परिसरात वैद्यकीय चाचणी मोहीम सुरू केलीय.

डॉक्टरांनी बाजीराव यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबईच्या एसआरएल लिमिटेड या वैद्यकीय लॅबमध्ये पाठविण्यात आले होते. त्यात स्वाइन फ्लू झाल्याचे स्पष्ट झालंय.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2014 10:28 PM IST

ताज्या बातम्या