बंगलोरचा दिल्लीवर 7 विकेट्स राखून रॉयल विजय

20 मे, आयपीएल स्पर्धेत पहिल्या नंबरवर असलेल्या दिल्ली डेअरडेव्हिल्सला पराभवाचा धक्का बसला आहे. अनिल कुंबळेच्या बंगलोर रॉयल चॅलेंजर्सने दिल्लीचा 7 विकेट्स राखून दणदणीत पराभव केला. दिल्लीनं विजयासाठी ठेवलेलं 134 रन्सचं माफक आव्हान बंगलोरने 3 विकेट्स गमावत पार केलं. बंगलोरची सुरवात डळमळीत झाली. ओपनिंगला आलेला रॉबिन उत्थप्पा झटपट आऊट झाला. पण त्यानंतर आलेल्या द्रविड आणि जॅक कॅलिसनं बंगलोरला विजयी मार्गावर आणून ठेवलं. द्रविड 38 रन्सवर आऊट झाला. तर रॉस टेलरनं 24 रन्सची तुफान खेळी करत विजयात महत्वाचा वाटा उचलला. बंगलोरच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं ते नॉटआऊट हाफसेंच्युरी करणार्‍या जॅक कॅलिसने. त्याआधी पहिली बॅटिंग करणार्‍या दिल्ली डेअरडेव्हिल्सने 7 विकेट्स गमावत 134 रन्स केले. प्रवीण कुमार सर्वाधिक यशस्वी बॉलर ठरला असून त्याने 3 विकेट्स घेतल्या तर अनिल कुंबळेनेही 2 विकेट्स घेत त्याला चांगली साथ दिली. या विजयाबरोबरच बंगलोरनं सेमीफायनलमध्ये पोहचण्याचं आपलं आव्हान जिवंत ठेवलं आहे.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 20, 2009 11:58 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading