Elec-widget

मोगलाई लागलीये का?, दादांचा तावडेंवर पलटवार

मोगलाई लागलीये का?, दादांचा तावडेंवर पलटवार

  • Share this:

pawar on tawade 4415 सप्टेंबर : काय मोगलाई वगैरे लागलीये का ? कुणीही उठतं आणि गृहमंत्री झाल्यावर अमूक करू तमूक करू मुळात भाजपची खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं अशी सवयच लागलीये असं खणखणीत प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे नेते विनोद तावडेंना दिलं. ते मुंबईत बोलत होते.

भाजपचं जर सरकार आलं तर मीच गृहमंत्री होणार असा दावा भाजपचे नेते विनोद तावडे आतापासूनच करायला लागले आहे. मी जर गृहमंत्री झालो तर सिंचन घोटाळ्यासाठी अजित पवारांना तुरूंगात टाकणार असं जाहीरपणे तावडे कबुली देत आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये तावडेंनी गृहमंत्रीपदाची इच्छा बोलून दाखवली त्यानंतर आज मीराभाईंदरमध्ये झालेल्या सभेतही त्यांनी पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर दावा केला. तावडेंच्या या इच्छेचा अजित पवारांनी आज चांगलाच समाचार घेतला. काय मोगलाई वगैरे वाटली आहे का ? कुणीही उठतं आणि गृहमंत्री झाल्यावर अमूक करू तमूक करू अशी बडबड करतं. मुळात भाजपची पहिल्यापासूनच खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं अशी पद्धत आहे असं प्रत्युत्तर पवारांनी दिलं. ज्यावेळी युतीचे सरकार होते त्यावेळीही ते असंच काही बोलायचे. दाऊदच्या मुसक्या आवळून आणू आणि अमूक करू तमूक करू पण काय झालं हे सगळ्यांची पाहिलं आहे अशी आठवणही अजित पवारांनी करून दिली.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2014 10:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...