युतीत महाभारत, शिवसेना 151 तर भाजप 135 वर ठाम

युतीत महाभारत, शिवसेना 151 तर भाजप 135 वर ठाम

  • Share this:

yuti mahabharat15 सप्टेंबर : महायुतीत सध्या जागावाटपावरून महाभारत सुरू झालंय. 151 ते 155 पेक्षा जागा कमी घेणार नाही, असा निरोप शिवसेनेने भाजपला कळवल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. तर भाजपची 135 जागांची मागणी आम्हाला मान्य नाही, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे युतीत जागावाटपाचा तिढा आणखी गुंतागुंतीचा झालाय.

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले मात्र अजूनही महायुतीत जागावाटपावरुन रस्सीखेच सुरूच आहे. भाजपने ज्यांच्या जागा जास्त त्यांचा मुख्यमंत्री होईल असा सूर लगावला. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची शर्यत जागावाटपासाठी आठकाठी ठरत आहे. त्यामुळेच शिवसेनेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजपची 135 जागेची मागणी शक्य नाही, पण युती तुटेल असं कोणतंही पाऊल उचलणार नाही असा थेट इशाराच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलाय. युतीही हिंदुत्वाच्या मुद्यावर आधारलेली आहे. त्यामुळे जोपर्यंत युतीचा फैसला होत नाही तोपर्यंत काहीही बोलणार नाही असा पवित्रा उद्धव यांनी घेतलाय. त्यातच आता 151 ते 155 पेक्षा जागा कमी घेणार नाही असा निरोपच शिवसेनेनं कळवला आहे.

त्याअगोदर रविवारी पुण्यात भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रूडी यांनी 135 जागेची मागणी केली होती. त्यानंतर आज मुंबईत भाजपच्या नेत्यांनी 'मातोश्री'वर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी जागावाटपाचा आपला फार्म्युला ठाकरेयांच्या समोर मांडला होता. पण रुडी या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यानंतर उद्धव यांनी पत्रकार परिषद घेऊन 135 जागांची मागणी अमान्य असल्याचं सांगितलं. आमची हिंदुत्वाचा आधारावर ही युती झाली आहे त्यामुळे जोपर्यंत युतीचा फैसला होत नाही त्यावर नकारात्मक काहीही बोलणार नाही असं उद्धव यांनी स्पष्ट केलं.

Follow @ibnlokmattv

First published: September 15, 2014, 6:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading