राणे समर्थक राजन तेलींसह 8 अपक्ष आमदार राष्ट्रवादीच्या तंबूत

राणे समर्थक राजन तेलींसह 8 अपक्ष आमदार राष्ट्रवादीच्या तंबूत

  • Share this:

ncp news315 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झालीये. आज (सोमवारी) राष्ट्रवादी समर्थक 8 अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय.

विशेष म्हणजे राणे समर्थक माजी आमदार राजन तेली यांनीही आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे राणेंसाठी हा मोठा धक्का मानला जातोय.

त्याच्यासह उत्तर कराडमधून बाळासाहेब पाटील वाईमधून मकरंद पाटील, रमेश थोरात, बाबासाहेब पाटील, सुरेश देशमुख, शरद गावित, साहेबराव पाटील, मानसिंग नाईक यांनीही प्रवेश केलाय.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलीक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. याच पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थित सर्व आठ अपक्ष आमदारांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

 हे आठ अपक्ष आमदार कोण आहेत ?

बाळासाहेब पाटील : उत्तर कराड

मकरंद पाटील : वाई

रमेश थोरात : दौंड

बाबासाहेब पाटील : अहमदपूर

सुरेश देशमुख : वर्धा

शरद गावित : नवापूर

साहेबराव पाटील : अमळनेर

मानसिंग नाईक : शिराळा

Follow @ibnlokmattv

First published: September 15, 2014, 5:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading