सर्वच पक्ष स्वबळाच्या दिशेने - अजित पवार

  • Share this:

ajit pawar on munde15 सप्टेंबर : सर्वच पक्षांची स्वबळाच्या दृष्टीनं वाटचाल सुरू आहे, असं सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय. 144 जागांच्या मागणीवर आजही आपण कायम आहोत. पण पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असही त्यांनी स्पष्ट केलंय.

मोठे आणि छोटे, यावर आमचा विश्वास नाही. पण वरिष्ठांनी आघाडीतल्या जागावाटपाबद्दल निर्णय घेतला आणि आम्ही आमच्या वरिष्ठांचं ऐकतो, असं अजित पवार आज पत्रकार परिषदेत म्हणाले.

सर्व पक्षांची स्वबळाकडे वाटचाल सुरू आहे असंही अजित पवार म्हणाले. एकाप्रकारे त्यांनी आघाडी आणि महायुतीमधला तिढा लवकर सुटणार नाही याचे संकेत दिले आहेत.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 15, 2014 05:25 PM IST

ताज्या बातम्या