15 सप्टेंबर : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात 'अनुभवाचे बोल' या मथळ्याखाली मुख्यमंत्र्यांवर टीका करण्यात आली आहे. ज्यांनी अनुभवाचे ढोल वाजवले त्यांनी राज्याचं दिवाळं काढलं, तेव्हा पृथ्वीराजबाबा, जाता जाता हसं करून घेऊ नका' असा सल्ला शिवसेनेने मुख्यमंत्र्यांना दिला आहे. उद्धव यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, त्याला अग्रलेखातून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. मात्र या अग्रलेखात जगावाटपाच्या तिढ्याबाबत काहीही उल्लेख करण्यात आलेला नाही.
उद्धव यांना सरकार चालवण्याचा अनुभव नाही, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, त्यावरही टीका करण्यात आली आहे. सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्यानं मुख्यमंत्र्यांचं मन अस्थिर झाल्याचा टोलाही या संपादकीयमध्ये लगावण्यात आला आहे. कोणताही अनुभव नसताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची गादी तुम्ही गरम केलीत. त्याचा फायदा ना त्या गादीला झाला ना महाराष्ट्राला असा उपरोधिक टोलाही लगावण्यात आलाय. ज्यांनी अनुभवाचे ढोल वाजवले त्या सर्वच अनुभवी पुरुषांनी देशाचे आणि राज्याचे दिवाळेच काढले, असं मत व्यक्त करत राज्यातल्या जनतेने ठरवलं तर मुख्यमंत्रीदाची जबाबदारी घ्यायलाही तयार असल्याचा पुनरुच्चार या अग्रलेखात करण्यात आला आहे. मात्र जागावाटपाविषयी भाजपकडून सुरू असलेल्या सल्ल्यांच्या भडीमाराबाबत सोयिस्कर मौन पाळलं आहे.
काय म्हटलंय अग्रलेखात?
स्वत: पृथ्वीराजबाबा सातारा-कराड परिसरात सुरक्षित मतदारसंघ शोधत आहेत. मात्र असा अतिसुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्याने त्यांचे मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनले आहे. प्रश्न इतकाच आहे की, स्वत: पृथ्वीराजबाबा राज्यात आले तेव्हा कोणत्या अनुभवाची डिग्री घेऊन मुख्यमंत्रीपदाच्या बोहोल्यावर चढले? ज्यांनी अनुभवाचे ढोल वाजवले त्या सर्वच अनुभवी पुरुषांनी देशाचे आणि राज्याचे साफ दिवाळेच काढले ना? तेव्हा पृथ्वीराजबाबा, जाता जाता स्वत:चे जास्त हसे करून घेऊ नका. कोणताही अनुभव नसताना महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची गादी तुम्ही गरम केलीत. त्याचा ना त्या गादीला फायदा ना महाराष्ट्राला.
Follow @ibnlokmattv |