सुरक्षित मतदारसंघावरून मुख्यमंत्र्यांची कोंडी

सुरक्षित मतदारसंघावरून मुख्यमंत्र्यांची कोंडी

  • Share this:

chavan-

15 सप्टेंबर :   मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सुरक्षित मतदारसंघ मिळत नाही, असा चिमटा सामनाच्या अग्रलेखात काढण्यात आला आहे. पृथ्वीराज चव्हाण दक्षिण कराड मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी उत्सुक आहेत. मात्र, त्यांच्यासमोर काँग्रेसचे जुने नेते आणि दक्षिण कराडमधले सध्याचे आमदार ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर यांचं आव्हान आहे. कुठल्याही परिस्थितीत आपणच दक्षिण कराडमधून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा आमदार विलास पाटील उंडाळकर यांनी केली आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा काँग्रेस हायकमांडकडे व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी दक्षिण कराड या मतदारसंघाची निवड केलीये, पण हा मतदारसंघ सोडवून घेताना मुख्यमंत्र्यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे, हे स्पष्ट दिसतं आहे.

काल नवी मुंबईमध्ये माथाडी भवनमधल्या मेळाव्यात बोलताना दक्षिण कराडचे विद्यामान आमदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलासकाका उंडाळकर यांनी कुठल्याही परिस्थितीत आपणच दक्षिण कराडमधून लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेसच्या गटातल्या उत्तर कराड मतदारसंघातील अपक्ष आमदार बाळासाहेब पाटील आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची दुहेरी कोंडी झाली आहे. आता मुख्यमंत्री दक्षिण कराडसाठी प्रतिष्ठा पणाला लावतील असा दावा त्यांच्या समर्थकडून केला जात आहे.

Follow @ibnlokmattv

First published: September 15, 2014, 10:35 AM IST

ताज्या बातम्या